
-अमित गवळे
पाली: पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या किंवा श्रावण अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो. जिल्ह्यात देखील काही शेतकरी या सणाला विशेष महत्त्व देतात. बैलांना गोडधोड खाऊ देतात. व सजवतात देखील करतात. शर्यतीच्या बैलांचा देखील येथे वेगळा थाट आहे.