Raigad News : आगरी-कोळी माणुसच दारु पितो आणि बाकीचे काय फक्त मिनरल वॉटर पितात का? सर्वेश तरे

संवादा दरम्यान हिंदी चित्रपटात जसं कामवाली बाई प्रत्येक वेळी मराठी स्त्री दाखवणं जसं मराठी माणसाला आवडत नाही तसच आगरी-कोळी माणूस प्रत्येक वेळा नाटक मालिका बेवडा अडाणी दाखवलेला आम्हाला अजिबात आवडणार नाही असे सांगितले.
sarvesh tare over agri koli people drink only what others did agri sahitya sammelan
sarvesh tare over agri koli people drink only what others did agri sahitya sammelanSakal

पाली : पनवेल येथे अखिल भारतीय आगरी अस्मिता या संस्थेचे कैलास पिंगळे यांच्यामार्फत रविवारी (ता.28) आगरी साहित्य संमेलन भरविण्यात आले होते.

यावेळी झालेल्या परिसंवादात आगरी-कोळी समाजातील व्यक्तीला नाटक, सिनेमा किंवा स्किटमध्ये नेहमी दारुड्या किंवा बेवडा दाखविण्यात येते याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. व याबद्दल आक्षेप घेऊन संबंधितांना सवाल विचारण्यात आला.

साहित्यिक सुरेश भोपी हे या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते. संमेलना दरम्यान ‘आगरी संस्कृती’ या परिसंवादात के.एम मढवी, डॉ.शोभा पाटील व युवा साहित्यिक सर्वेश तरे यांचा सहभाग होता.

परिसंवादा दरम्यान हिंदी चित्रपटात जसं कामवाली बाई प्रत्येक वेळी मराठी स्त्री दाखवणं जसं मराठी माणसाला आवडत नाही तसच आगरी-कोळी माणूस प्रत्येक वेळा नाटक मालिका बेवडा अडाणी दाखवलेला आम्हाला अजिबात आवडणार नाही असे सांगितले.

मराठी चित्रपट सृष्टीत आगरी-कोळी समाजाचे चुकीचे होत असलेल्या चित्रीकरणावर ताशेरे ओढले. सोबतच दिग्दर्शक अशोक हांडे यांच्या ‘मराठी बाणा’ ह्या नाटकातील एका प्रसंगात आगरी-कोळी वेशभुषेतील व्यक्तीची हातात दारुची बाठली घेऊन विशेष प्रवेश दाखविला गेला आहे ज्यावरुन अनेक आगरी कोळी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

यावरुनच सर्वेश तरे यांनी ‘बाकीचे समाजान क फक्त मिनरल वोटर पिला जाते क? असा खोचक सवाल दिग्दर्शक अशोक हांडे यांना केला आहे. सोबतच मराठी सृष्टीलाही आवाहन केले आहे की इतकी वर्ष समाजाची तुम्ही एकच बाजू दाखवत आलात ठीक परंतू ह्याच समाजाच्या एका माणसाने ७ वर्ष शेतकऱ्यांसाठी शेती न पिकवता लढत ‘कसेल त्याची जमीन कुळ कायदा’ बनवला ही संघर्षाची बाजू दाखवा,

जमिनीच्या बदल्यात जमिन म्हणजे साडेबारा टक्के कायदा प्रकल्पग्रस्तांसाठी आणनाऱ्या लोकनेते दि. बा. पाटील या योध्याची कहाणी दाखवा, याच समाजातला साध्या घरातला मुलगा शास्त्रज्ञ चिन्मय म्हात्रे भारताची चांद्रयान ३ मोहीम यशस्वी करण्यात हातभार लावतो हे ही दाखवा, आणि या समाजातल्या एका मुलीच्या चिकाटी २३ वर्षांनंतर महाराष्ट्रातल्या एका मराठी मुलीला अर्जुन पुरस्कार प्राप्त होतो त्या कब्बडीपट्टू भारतीय संघाची माजी कॅप्टन अभिलाषा म्हात्रे यांच्याच्याबद्दल ही दाखला असे मत व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com