खासगी बस उलटून तीन ठार; 29 जखमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

सावर्डे - मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डेजवळ आगवे येथील अवघड वळणाचा अंदाज न आल्याने खासगी आरामबस उलटून झालेल्या अपघातात तिघे ठार झाले, तर 29 प्रवासी जखमी झाले. जखमींना डेरवण येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

स्वप्नाली राकेश शिर्के (वय 45, ताडदेव-मुंबई), दर्शन शशिकांत ठुकरुल (10, कोंभुर्ले-देवगड), उमेश दुर्योधन सवणे (30, विक्रोळी) अशी मृत प्रवाशांची नावे आहेत.

आज पहाटे परेलहून मालवणकडे जाणारी विशाल ट्रॅव्हल्सची आरामबस आगवे येथे उलटली. चालक चंद्रशेखर दिलीप काळंगे (मूळ गाव खटाव, जि. सातारा, सध्या भायखळा-मुंबई) यांना अवघड वळणाचा अंदाज आला नाही. दरवाजाच्या बाजूला बस उलटल्याने प्रवाशांना बाहेर पडता येत नव्हते. पोलिसांनी प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढले. या अपघातात दर्शन ठुकरुल आणि उमेश सवणे जागीच ठार झाले होते. स्वप्नाली शिर्के यांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.

Web Title: savarde news 3 death in private bus overdue