धवल सवतसड्याला धुंद अतिउत्साहाची काळी किनार  

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

सवतसडा धबधबा पर्यटकांच्या अतिरेकी कृत्यामुळे आपली ओळख व महत्त्व हरवत चाललाय. या धबधब्याचे सौंदर्य काही औरच.तुषारामध्ये इंद्रधनुष्याची छटा आणि बेफाम कोसळणाऱ्या सरीमध्ये चिंब होण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढत आहे. मद्यधुंद युवकांची मानसिकता येऊन थडकली आहे. धबधब्याजवळ उपस्थित महिला व तरुणींकडे पाहून अश्‍लील हावभाव करणे, टोमणे मारणे आदी त्रासामुळे रोज नव्या वादाला तोंड फुटत आहे. मद्यधुंद तरुणांनी फोडलेल्या मद्याच्या बाटलीच्या काचा रस्त्यावर पडलेल्या असतात. खाद्यपदार्थाची तेथेच नासाडी केल्यामुळे हा धबधबा आपले रूपच हरवण्याची भीती आहे.

सवतसडा धबधबा पर्यटकांच्या अतिरेकी कृत्यामुळे आपली ओळख व महत्त्व हरवत चाललाय. या धबधब्याचे सौंदर्य काही औरच.तुषारामध्ये इंद्रधनुष्याची छटा आणि बेफाम कोसळणाऱ्या सरीमध्ये चिंब होण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढत आहे. मद्यधुंद युवकांची मानसिकता येऊन थडकली आहे. धबधब्याजवळ उपस्थित महिला व तरुणींकडे पाहून अश्‍लील हावभाव करणे, टोमणे मारणे आदी त्रासामुळे रोज नव्या वादाला तोंड फुटत आहे. मद्यधुंद तरुणांनी फोडलेल्या मद्याच्या बाटलीच्या काचा रस्त्यावर पडलेल्या असतात. खाद्यपदार्थाची तेथेच नासाडी केल्यामुळे हा धबधबा आपले रूपच हरवण्याची भीती आहे. गेल्या वर्षी काही अतिउत्साही तरुणांच्या हुल्लडबाजीत काहीजण किरकोळ जखमी देखील झाले. बेधुंद युवकांमुळे चिपळूणचे नाव पर्यटन क्षेत्रात बदनाम होऊ नये, अशी येथील नागरिकांची अपेक्षा आहे.

वेगळा मार्ग शोधावा लागेल
राजापूर तालुक्‍यात चार ते पाच, संगमेश्‍वर तालुक्‍यात सुप्रसिद्ध मार्लेश्‍वर, रत्नागिरीमधील निवळी, उक्षी, पानवळ, तसेच चिपळुणातील सवतसडा आणि सध्या प्रकाशात येत असलेला वीरचा धबधबा हे प्रामुख्याने पर्यटकांचे हॉट डेस्टिनेशन आहेत. मार्लेश्‍वरला धारेश्‍वर धबधब्याखाली जाताच येत नाही. आणखी काही धबधब्यांची स्थिती अशीच आहे. मात्र ते पडल्यानंतर जेथे प्रवाहित होतात, तेथील डोहही धोकादायक आहेत. मार्लेश्‍वरला याचा अनुभवही आला आहे.

Web Title: savatsada waterfall tourist