सावडाव - पांढराशुभ्र धबधबा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

मुंबई-गोवा महामार्गापासून अवघ्या सहा किलोमीटर असलेला सावडाव धबधबा (ता. कणकवली) पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक सहकुटुंब येतात. प्रथम धबधब्याचा डोंगर लागतो. उखडलेली खडी, रस्त्याच्या मध्ये असलेले खड्डे असा खडतर मार्ग पार केल्यानंतर लगेचच पांढराशुभ्र धबधबा दृष्टिक्षेपात पडतो. सध्या सावडावचा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून, वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जिल्हा आणि जिल्हाबाहेरील पर्यटकांचा ओघ सुरू झाला. 

या आहेत अडचणी
रस्ता अत्यंत धोकादायक.
स्वच्छतागृह, चेंजिंग रूमचीही डागडुजी नाही 
मद्यपिकडून धबधब्याच्या पाण्यात दारूच्या बाटल्या फेकल्या जात असल्याने पर्यटक जखमी होतात.
उंचावरून निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी बांधलेल्या मनोऱ्याचे रेलिंग तुटले

हे आहेत उपाय
धबधब्याच्या डोहापर्यंत जाण्यासाठी  पायऱ्या आणि सुरक्षा कठडे गरजेचे
सध्याच्या सुविधांची 
डागडूजी गरजेची
धबधब्याचा डोह स्वच्छ करायला हवा
पर्यटक डोहातून वाहून जावू नयेत  यासाठी आजूबाजूला सुरक्षा जाळीची गरज.

Web Title: savdav waterfall in kankavali