या दहा सावित्रीच्या लेकींना यांच्यामुळे मिळाले पालकत्व....

savitribai fule Adoption Parent Scheme in mandangad kokan marathi news
savitribai fule Adoption Parent Scheme in mandangad kokan marathi news

मंडणगड (रत्नागिरी) : मंडणगड तालुक्याच्या इतिहासात प्रथमच एकाच दिवशी दहा मुलींचे पालकत्व घेण्यात आले. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत तीस हजारांचा निधी अब्दुलरब अब्दुल गफार रहिमानी यांनी आपला मुलगा मोहसिन इम्रान अब्दुलरब रहिमानी यांच्या स्मरणार्थ दिला. त्यांच्या या शैक्षणिक दातृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेच्या माध्यमातून मुलींना लाभ मिळवून देण्याचे विधायक काम २०११ पासून शिपोळे शाळेचे पदवीधर शिक्षक पुंडलिक शंकर शिंदे हे सातत्याने करीत आहेत. प्रवर्तक म्हणून आतापर्यंत सावित्रीच्या १३७ लेकींसाठी पालकत्व मिळविले असून हा प्रवास पुढे सुरूच आहे. याकामी अनेक शिक्षणप्रेमीनी त्यांना साथ देत मदतीचा हात पुढे केला. मंडणगड पंचायत समितीचे माजी सभापती आदेश केणे यांनी या विधायक कामाला सहकार्य करण्याचे आश्वासन पुंडलिक शिंदे यांना दिले होते.

सावित्रीच्या १३७ लेकींसाठी पालकत्व

पाट येथील रहिवासी व सध्या मुंबईत राहणारे अब्दुलरब अब्दुल गफार रहिमानी यांनी आपला मुलगा पै.मोहसिन इम्रान अब्दुलरब रहिमानी यांच्या स्मरणार्थ दहा मुलींचे पालकत्व घेताना तीस हजारांचा निधी आदेश केणे यांच्याकरवी गटशिक्षणाधिकारी नवनाथ कुचेकर यांच्याकडे. ता.४ मार्च रोजी सुपूर्त केला. यावेळी माजी सभापती आदेश केणे, गटशिक्षणाधिकारी नवनाथ कुचेकर, आबा कदम, पुंडलिक शिंदे, श्री.आंब्रे उपस्थित होते.

सदरचा निधी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा पाट या शाळेतील इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या पायल महाडिक, अनन्या महाडिक, अपूर्वा चिले, साक्षी कुटेकर, वनिता वाघमारे, इयत्ता दुसरीतील जानवी रिकामे, तेजस्वी दिवेकर, करिष्मा चिले, अक्षरा दिवेकर, नम्रता दिवेकर या विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. पाट शाळेच्या मुख्याध्यापिका वैभवी मराठे, उपशिक्षक गणेश शेडगे, शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने याबाबत सर्वांचे आभार मानले आहेत.

देणगी रक्कमेला आयकर सवलतीसाठी प्रयत्न
सध्याच्या काळात शिष्यवृत्ती म्हणून वार्षिक ३०० रुपये ही रक्कम खूपच तुटपुंजी असून ती किमान ५०० रुपये तरी व्हावी. जिल्हा परिषदेने त्यात स्वनिधी जमा करावा. कमी पटाच्या शाळा बंद होत असल्याने विद्यार्थीसंख्येनुसार लाभार्थी मुलींची संख्या सुद्धा कमी होत आहे. जुन्या निधीचा आढावा घेऊन त्यातून हा लाभ मिळावा. ३ हजार रक्कम वाढवून ५ हजार करावी व त्या देणगी रक्कमेला आयकर सवलत मिळण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न करावेत.
- पुंडलिक शिंदे, पदवीधर शिक्षक व प्रवर्तक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com