esakal | त्याला काजू बी काढल्याचा आला राग म्हणून मारले आजीला....
sakal

बोलून बातमी शोधा

From the wrath of cashew nuts Beating the grandmother kokan marathi news

तालुक्‍यातील शेनाळे येथील काजूच्या झाडावरील बी काढल्याच्या रागातून महिलेला मारहाण केल्याप्रकरणी मंडणगड पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याला काजू बी काढल्याचा आला राग म्हणून मारले आजीला....

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मंडणगड (रत्नागिरी) : तालुक्‍यातील शेनाळे येथील काजूच्या झाडावरील बी काढल्याच्या रागातून महिलेला मारहाण केल्याप्रकरणी मंडणगड पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील दिलीप पवार (रा. आदिवासीवाडी-दुधेरे) असे संशयिताचे नाव आहे. 

हेही वाचा-  फोंडाघाटमध्ये पूर्ववैमनस्यातून मोटरसायकल जाळल्याचा प्रकार

ही घटना २६ फेब्रुवारीला शेनाळे येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरिता सीताराम शिंदे (वय ६३, रा. शेनाळे) यांच्या मुलाने खरेदी केलेल्या शेनाळे येथील जमिनीतील काजू व आंबा कलमांना पाणी घालण्यासाठी त्या गेल्या होत्या. त्यांच्यालगत जमीन असलेल्या संजय सोलकर यांच्या काजूच्या झाडांना लागलेल्या काजू बियांची फांदी शिंदे यांच्या तारेच्या कुंपणावरुन जागेत आली होती. 
त्या फांदीच्या काजूबिया शिंदे यांनी काठीने पाडून गोळा करत असताना संशयित सुनील पवार याने त्यांना तू काजू बिया का काढतेस, मी त्या खरेदी केलेल्या आहेत, असे ठणकावले. 

कलमांना पाणी घालण्यासाठी त्या गेल्या होत्या

हेही वाचा- आता ओबीसीचे थेट पंतप्रधानांना साकडे....

यावर शिंदे यांनी तुुझ्या काजुच्या बिया तुुझ्या जमिनीतुून काढून घे, माझे तारेचे कुंपण वाकवून नुकसान करू नकोस असे बोलण्याचा राग मनात धरून सुनील पवार याने शिंदे यांना हातातील काठीने मारून शिवीगाळ केली. ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शिंदे यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली.