रत्नागिरीत ‘त्या’ जहाजामुळे समुद्रात होतेय जलप्रदूषण....

water pollution from ships kokan marathi news
water pollution from ships kokan marathi news

रत्नागिरी : तालुक्‍यातील जयगड बंदरात गेल्या सहा महिन्यांपासून तीन वाव समुद्रात डिझेल वाहतूक करणारे जहाज उभे आहे. इंजिन नादुरुस्त झाल्यामुळे त्या जहाजातील डिझेल दुसऱ्या जहाजामध्ये भरण्याचे काम सुरू आहे. उभ्या जहाजातूनही ऑइलची गळती झाल्यामुळे जयगड बंदरात मोठ्या प्रमाणावर जल प्रदूषण होत आहे, अशी तक्रार जयगड येथील स्थानिक मच्छीमारांनी निवेदनाद्वारे केली आहे. जलप्रदूषण करणाऱ्या जहाजावर कारवाई करावी, तोपर्यंत संबंधित जहाज हलवू नये, असे आदेश द्यावेत, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.

हे निवेदन बुधवारी (ता. ४) जिल्हा प्रशासनाकडे सादर केले आहे. मासेमारीतूनच उदरनिर्वाह सुरू आहे. या व्यवसायावर जयगड बंदरात उभ्या असलेल्या एका जहाजामुळे मोठा परिणाम झाला आहे. मागील जवळपास सहा महिने एक जहाज जयगड बंदरजवळ उभे आहे. हे जहाज डिझेल वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली आहे. हे जहाज मागील सहा महिने एकाच जागी कोणत्या कारणासाठी उभे आहे, याची खात्रीलायक माहिती आम्हाला अद्याप मिळालेली नाही, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

सहा महिने एकाच ठिकाणी जहाज उभे

यामध्ये पंचायत समिती माजी सदस्य विवेक सुर्वे, सरफराज सैतवडेकर, अनिस अडुलकर, रिझवान वाडकर, हसरत जांभारकर, बिलाल मिरकर आदी मच्छीमार उपस्थित होते.या बंद जहाजातील डिझेल दुसऱ्या जहाजात भरण्याचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. यासाठी आवश्‍यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, याबाबतही अद्याप ठोस उत्तर मिळालेले नाही. 

समुद्राच्या पाण्याचा रंगही बदलला
बंद जहाजातील ऑईल गळती होत असून, त्या परिसरात प्रचंड प्रदूषण होत आहे. पाण्याचा रंगही बदलला आहे. याचा मासेमारीवर मोठा परिणाम होऊ शकतो. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. जोपर्यंत प्रदूषणाचा प्रश्न निकाली लागत नाही, तोपर्यंत त्या जहाजाला जयगड बंदरातून जाण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी मच्छीमारांनी जिल्हा प्रशासनाकडे केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com