सावंतवाडी-माठेवाड्यातील धबधब्यावर गर्दी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

सावंतवाडी - ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या विकासाच्या उंबरठ्यावर असलेल्या येथील शहरात आणखी एका पर्यटनस्थळाची भर पडली आहे. येथील माठेवाडा भागात नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्यावर आज गर्दी पाहायला मिळाली.

गटारी आणि रविवार असल्यामुळे अनेक स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनीसुध्दा या धबधब्याचा मनमुराद आनंद लुटला. शहरापासून फक्त दोनशे मीटर अंतरावर असलेल्या या धबधब्याच्या परिसराचा विकास करण्याची मागणी नागरीकांतून होत आहे. पालिकेने या पर्यटन प्रकल्पाकडे लक्ष देऊन योग्य तो विकास करावा, अशी मागणी माठेवाडा येथील कुणाल सावंत यांनी 
केली आहे.

धबधबा असलेली जागा नेमकी कोणाची आहे, याची माहिती घेण्यात येणार आहे. तसेच तो भाग वन विभागाच्या हद्दीत येत असल्यास परिसराचा विकास करण्यासाठी वन विभागाची मदत घेता येऊ शकते. सद्यस्थितीत 
त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता आहे. त्यामुळे अनेक नागरिक आणि पर्यटक त्या ठिकाणी भेटी देतात. त्याचा लाभ शहरासाठी होणार आहे.
- बबन साळगावकर, नगराध्यक्ष.

सुटी आणि गटारीचा ‘सावडाव’वर मेळ...

नांदगाव - सावडाव धबधब्यावर रविवारी सकाळपासूनच पर्यटकांनी गर्दी केली. सुटी आणि गटारी अमावास्या हा योग जुळून आल्याने पर्यटकांच्या उत्साहाला उधाण आले होते. अतिउत्साही मंडळींवर नजर ठेवण्यासाठी शनिवारपासून धबधब्यावर पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यामुळे पर्यटकांनी समाधान व्यक्त केले.

सावडाव धबधब्यावरील पर्यटकांची दिवसेंदिवस वाढती संख्या व अनेकांना या धबधब्याची पडलेली भुरळ त्यामुळे सुटीच्या दिवशी याठिकाणी जिह्याबाहेरील पर्यटकही मोठ्या संख्येने येत असल्याने धबधब्यावर गर्दी होत आहे. मात्र काही मद्यप्राशन करणाऱ्यामुळे पर्यटन स्थळाला गालबोट लागते. यासाठी वारंवार पोलिस बंदोबस्ताची मागणी केली जात होती.

याबाबत कार्यवाही झाली. येथे येणारे काही अतिउत्साही तरुण मुख्य प्रवाहाच्या ठिकाणी असलेल्या झाडाकडून सुमारे ५० फूट खोल पाण्यात उड्या मारतात. असे जीवघेणे प्रकार कोणी करू नयेत, असे आवाहन सरपंच संतोष तेली यांनी केले आहे.

Web Title: sawantwadi konkan news sawantwadi-mathewadi waterfall crowd