यंदाच्या खरिपाची उद्दिष्टपूर्ती अद्याप नाहीच

भूषण आरोसकर
गुरुवार, 27 जुलै 2017

कामे अंतिम टप्प्यात - ४४०९८ हेक्‍टर क्षेत्रावर लावणी पूर्ण; पाऊस अनुकूल 

सावंतवाडी - जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस खरिपासाठी अनुकूल ठरला असून अंतिम टप्यातली कामे सुरू आहेत. आतापर्यंत ४४ हजार ९८ हेक्‍टर क्षेत्रावर खरीप पिकांची लावणी पूर्ण झाली आहे. उद्दिष्ट पूर्ततेसाठी आणखी १० ते ११ हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली येणे आवश्‍यक असून तेथे फळझाड लागवड करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पावसाने मोठी हानी केली. यात जिल्ह्यातील काही भागातील शेती प्रभावित झाली होती; मात्र मोठा फटका भातशेतीला बसला नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. आतापर्यंत खरिपाची जवळपास अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. विशेषतः भातशेतीची पेरणीही पूर्ण होत आली असल्याने काही भागात पेरणीपूर्व करण्यात येत असलेली पारंपारिक नांगरणी सुरु आहे. आतापर्यंत ४३ हजार ४५४ हेक्‍टर क्षेत्रावर भातशेतीची लावणी पूर्ण झाली असल्याचे कृषि विभागाकडून सांगण्यात आले.

इतर पिकांत नाचणी ४१२ हेक्‍टर, भूईमुग ३० हेक्‍टर, तीळ २ हेक्‍टरवर लावणी पुर्ण झाली. २०० हेक्‍टर क्षेत्रावर भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले जात आहे. यात ऊसाचीही जवळपास १७ ते १९ हेक्‍टर क्षेत्रावर उत्पन्न घेतले जात आहे. जुलैअखेरपर्यंत ४४ हजार ९८ हेक्‍टर क्षेत्रात १० हेक्‍टरपर्यंत वाढ होणार असल्याचे कृषि विभागाकडून सांगण्यात येत आहे. 

यंदा खरीपासासाठी गेल्यावर्षीच्या तुलनेत ५ हेक्‍टरने कमी उद्दीष्ट देण्यात आले होते. गतवर्षी ६८ हजारच्या आसपास तर यंदा लागवडीखाली आणण्यासाठी ६३ हजार हेक्‍टर क्षेत्र उद्दीष्ट देण्यात आले होते; मात्र उद्दीष्टाएवढे क्षेत्र लागवडीखाली येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. हळव्या भातपिकाच्या लागवडीखाली येणारे क्षेत्राचा विचार फळझाड लागवडीसाठी करुन उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही कृषि विभागाकडून सांगण्यात आले.

६३ हजार हेक्‍टर क्षेत्रापैकी १० ते ११ टक्के क्षेत्र उद्दिष्टापासून प्रलंबित राहू शकते. असे असले तरी या उरलेल्या क्षेत्रामध्ये फळझाड लागवड करून ते क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. हळव्या भातपिकाच्या जागेचाही यात विचार करण्यात येणार आहे. शेतकरीवर्गाला त्याचा फायदा होईल.
- अरुण नातू, तांत्रिक अधिकारी, कृषी विभाग

Web Title: sawantwadi konkan news this year's kharip goal is not yet fulfilled