esakal | सावंतवाडी : विसर्जनासाठी खरेदी केलेल्या इंजिन बोटींचा शुभारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

sawantwadi

सावंतवाडी : विसर्जनासाठी खरेदी केलेल्या इंजिन बोटींचा शुभारंभ

sakal_logo
By
रुपेश हिराप

सावंतवाडी : गणेश चतुर्थी सणामध्ये येथील मोती तलावात गणेश विसर्जन नगर पालिका प्रशासनाकडून खरेदी करण्यात आलेल्या बोटींचा शुभारंभ आज नगराध्यक्ष संजू परब यांनी केला. गणेश विसर्जन हा बरोबर मोती तलावाची स्वच्छता व पर्यटन वाढीसाठी या बोटींचा वापर केला जाणार असल्याचे यावे नगराध्यक्ष श्री परब यांनी सांगितले.

सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाकडून पलीकडेच गणेश विसर्जन न करता तीन इंजिन बोट खरेदी करण्यात आल्याचे नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितले होते चार दिवसापूर्वीच सदर च्या बोटी या ठिकाणी दाखल झाल्या, यामध्ये एक मोठी तर दोन लहान अशा एकूण तीन बोटी पालिकेकडून खरेदी करण्यात आलेल्या आहेत मोती तलावाच्या काठावर गणपती विसर्जना साठी या बोटींचा वापर केला जाणार आहे यापैकी मोठी बोट श्रीराम वाचन मंदिर समोर येथील गणपती साना ठिकाणे ठेवण्यात येणार आहे तर अन्य दोन बोटी होटेल पॉम्पस व हॉटेल लेक व्ह्यु या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे असे नगराध्यक्ष श्री परब यांनी सांगितले.

हेही वाचा: शिक्षक पर्व २०२१ : पंतप्रधान मोदींनी सुरू केले महत्वाचे उपक्रम

सावंतवाडी मोती तलाव यामध्ये यापूर्वी गणेश विसर्जन तराफ्याच्या सहाय्याने तसेच लहान बोटीच्या सहाय्याने केले जात होते सदरचे विसर्जन हे मोती तलावात तलावाच्या काठी नजीकच केले जात होते मात्र आता सर्दी करण्यात आलेल्या मोठ्या इंजिन बोटीच्या माध्यमातून गणेश विसर्जन खोल पाण्यामध्ये करता येणार आहे शिवाय तराफ्याच्या साह्याने गणेश विसर्जन करताना अनेक अडचणी चा सामना करावा लागत होता मात्र आता सहजरीत्या हे विसर्जन करता येणार आहे.

या बोटींच्या माध्यमातून भविष्यात मोती तलावातील नौकानयन तसेच वोटिंग प्रकल्प यातून पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केला जाणार आहे तसेच तलावाच्या काठावर पाण्यामध्ये साचणारा कचरा व तलाव स्वच्छतेसाठी त्या बोटींचा वापर केला जाणार आहे असेही नगराध्यक्ष म्हणाले.

या शुभारंभ कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्यासह उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर,आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, राजू बेग, नगरसेविका अनारोजीन लोबो,शुभांगी सुकी, दिपाली भालेकर ,भारती मोरे ,समृद्धी विर्नोडकर, उत्कर्षा सासोलकर आदी उपस्थित होते.

loading image
go to top