esakal | सावंतवाडी : लोकमान्य टिळक सभागृहात गणेश उत्सव नियोजनाबाबतची बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

लोकमान्य टिळक सभागृह

सावंतवाडी : लोकमान्य टिळक सभागृहात गणेश उत्सव नियोजनाबाबतची बैठक

sakal_logo
By
रुपेश हिराप

सावंतवाडी : गणेश चतुर्थी कालावधीत शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार होऊ नये, शिवाय वाहतूक कोंडीसारखी समस्या उद्भवू नयेत यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. परप्रांतीय भाजीविक्रेत्यांना आठवडा बाजार वगळता भाजी विक्री करता येणार नसल्याचे नगराध्यक्ष संजु परब यांनी यावेळी स्पष्ट केले. रिक्षा व्यवसायिकांनी आपल्या स्टॅण्डच्या ठिकाणी रिक्षा लावुन व्यवसाय करावा, अशा सूचनाही त्यांनी रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.

हेही वाचा: 'ठाकरे सरकारनं लोकांना मारुन टाकायचं ठरवलंय का?' राणे खवळले

येथील पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात गणेश उत्सव नियोजनाबाबतची बैठक नगराध्यक्ष परब यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी गणेश चतुर्थीसाठी लागणारे माटी सामान विक्रीसाठी दरवर्षीप्रमाणे बाळकृष्ण कोल्ड्रिंक्स ते पालिका कार्यालय पर्यंतची जागा राखीव ठेवण्यात आली आहे. भाजी विक्री करण्यासाठी श्रीराम वाचन मंदिर ते शिवरामराजे पुतळा पर्यंतची जागा राखीव ठेवण्यात आली आहे. फळ विक्री करण्यासाठी पांगम दुकान ते कल्पना हॉटेल, केसरकर कॉम्प्लेक्सची जागा राखीव ठेवण्यात आली असून तलावाकाठी देखील फळ विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे नगराध्यक्ष परब यांनी सांगितले.

हेही वाचा: आरे-वारेला CRZ चा खो; प्रकल्प होणारच, शिक्षणमंत्र्यांचा संकल्प

गणेश चतुर्थीच्या दिवसात टू व्हीलर पार्किंगसाठी शांती निकेतन शाळा पटांगण, कळसुलकर शाळा पटांगण तर फोर व्हीलरसाठी आर.पी.डी. शाळा पटांगण, तीन मूशी ते रेस्ट हाऊस, हॉटेल पॉम्पसकडील रस्ता तसेच सहा सिटर व रिक्षा टेम्पोसाठी गार्डन येथे पार्किंग ठेवण्यात आला आहे. यावेळी ८ सप्टेंबरपासून पुढील १३ दिवस बाजारपेठेतून एसटी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी शहरातील लाईट गणेश उत्सव काळात जाता कमा नये, त्यासाठी आताच महावितरण विभागाने कामाला लागावे. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यास शहरातील विद्युत लाईनवर आलेली झाडे तोडण्यासाठी पालिकेचे कर्मचारी पुरविण्यात येतील; मात्र लाईटचा प्रश्न निर्माण होता कामा नये, असे नगराध्यक्ष श्री.परब यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

हेही वाचा: विलीनीकरणाने कोकण रेल्वेत अनिष्ट बदल

या बैठकीला उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, मनोज नाईक, सुरेंद्र बांदेकर, नगरसेविका दिपाली भालेकर, समृध्दी विर्नोडकर, उत्कर्षा सासोलकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील, महावितरण उपकार्यकारी अभियंता भुरे, वाहतुक पोलिस प्रविण सापळे, आगार व्यवस्थापक वैभव पडोळे, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ अध्यक्ष, व्यापारी संघटना अध्यक्ष, रिक्षा संघटनेचे सुधीर पराडकर आदी उपस्थित होते.

loading image
go to top