कमी उत्पादनाने बॉयलर चिकनचे भाव वधारले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

सावंतवाडी - बॉयलर कोंबड्यांच्या कमी उत्पादनाचा परिणाम आता बाजारभावावर दिसून येत आहे. या बाजारभावाला आता ४० ते ४५ रुपये वाढत्या दराची फोडणी मिळाली आहे. यामुळे काही प्रमाणात ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे; मात्र मान्सूनच्या आगमनाने येत्या काही दिवसांत दरात घसरण होण्याची शक्‍यता आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर बॉयलर कोंबड्याचे दर बऱ्यापैकी वाढल्याचे चित्र आहे. पंधरा दिवसापूर्वी या दरांत ४० ते ४५ रुपयांनी वाढल्याचे दिसून येत आहे. सध्या बाजारात नेट चिकन दर २२० रुपये दराने विकले जात आहे. हेच नेट चिकन साधारणतः पंधरा दिवसांपूर्वी १८० रुपये किलो या भावाने विकले जात होते. यात कोंबडी चिकन दर १२० रुपये होता तो आता १४० रुपयांनी विकले जात आहे. याच दर १४५ रुपये किलो एवढा आहे. दरम्यान बार बंदीचाही बराच परिणाम मटण-चिकन विक्रेत्यांच्या दुकानावर दिसून येत आहे. काही विक्रेत्याच्या म्हणण्यानुसार बार बंदीनंतर बऱ्याच ग्राहकांनी याकडे पाठ फिरवली आहे. बार बंदीपूर्वी चांगल्यापैकी रोजचा ग्राहक कमी झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात रविवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी काही प्रमाणात ग्राहकाचा प्रतिसाद दिसून येत आहे. वाढत्या भावामुळे बाजारात किरकोळ विक्रीत घट झालेली पहावयास  मिळत आहे.

गावठी कोंबड्याचे दरही वाढले
गावठी कोंबड्याच्या दरातही काही प्रमाणात वाढ झाली असून ३०० रुपयाच्या आसपासच्या दराने त्याची विक्री करण्यात येत आहे. सध्या पुरेशा कोंबड्यांचे उत्पादन नसल्यामुळे बाजारभावात वाढ झाली आहे. मात्र, पावसाळ्यात याच दरात पुन्हा स्थिरता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्याचा फायदा मिरगाच्या कालावधीत होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Web Title: sawantwadi news chicken

टॅग्स