सावंतवाडीत घरपट्टी सर्वेक्षणास सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

दरवाढीची शक्‍यता - बंद घरांचे होणार पुन्हा सर्वेक्षण, सहकार्याचे आवाहन

सावंतवाडी - येथील पालिकेकडून चार वर्षांनी घरपट्टी सर्वेक्षण सुरू करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर पालिका कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. विशेष म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घरपट्टीच्या दरात वाढ होण्याची शक्‍यता आहे.

याबाबत अधिकारी आसावरी शिरोडकर यांनी दुजोरा दिला असून यावर्षीपासून नव्याने दर आकारण्यात येणार आहे. त्यात काही अंशी वाढ होण्याची शक्‍यता आहे असे त्यांनी सांगितले.

प्रत्येक शहराचे दर चार वर्षांनी सर्वेक्षण करण्यात येते. यात नव्याने उभारण्यात आलेल्या घरांची मोजदाद करून नव्याने घरपट्टी आकारण्यात येते. त्यासाठी आवश्‍यक असलेली प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. सद्य:स्थितीत घरोघरी कर्मचारी पाठवून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहेत.

याबाबतची माहिती पालिका प्रशासनाच्या अधिकारी सौ. शिरोडकर यांनी दिली. त्या म्हणाल्या, ‘‘चार वर्षानी हा सर्व्हे होत आहे. यासाठी एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. प्रत्येक वाॅर्डात एक पालिका कर्मचारी नेमून त्याला वाढीव बांधकाम, नवे बांधकामांची मोजदाद करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. वाॅर्डावाॅर्डात फिरून संबंधित कर्मचारी घरांची माहिती घेत आहेत. नव्याने पुढील वर्षी आकारण्यात येणाऱ्या घरपट्टीमध्ये ही वाढ धरण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू आहे; मात्र किती वाढ होईल हे आत्ताच सांगता येणार नाही.’’ या सर्वेक्षणात बंद असलेल्या घराचाही पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार आहेत. काही जण सुट्टीनिमित्त बाहेर गेल्याचे समजते. त्यामुळे त्या घराकडे पुन्हा कर्मचारी जाणार आहेत. या सर्व प्रक्रियेत नागरिकांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.

भाडोत्री असल्यास वाढीव आकार 
सौ. शिरोडकर म्हणाल्या, ‘‘या प्रक्रियेत घर मालक घरात राहिल्यास त्याला नियमित घरपट्टी आकरण्यात येणार आहे; मात्र घरात अथवा फ्लॅटमध्ये भाडोत्री असल्यास जास्त दर आकारण्यात येणार आहे.’’

Web Title: sawantwadi news home tax survey