निराधार गर्भवती महिलेचे सावंतवाडीतून पलायन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

सावंतवाडी - येथील अंकुर महिला केंद्रात दाखल असलेल्या निराधार महिलेने पलायन केले आहे. संबंधित महिला आठ महिन्यांची गर्भवती आहे, त्यामुळे तिच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नेहा गोविंद चव्हाण (वय 22, रा. कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. हा प्रकार काल (ता.17) सकाळी साडेअकराच्या सुमारास येथील कुटिर रुग्णालयात घडला. या प्रकरणी आज केंद्राच्या काळजीवाहूंकडून तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार पोलिस ठाण्यात बेपत्ताची नोंद केली आहे. 

याबाबत तपासिक अमलदार पोलिस उपनिरीक्षक देवानंद माने यांनी दिलेली अधिक माहिती अशी की संबधित निराधार महिला कोल्हापूर येथील आहे. त्या महिलेने तेथील युवकाबरोबर विवाह केला होता. दरम्यान, काही दिवसांनी पतीचे आणि तिचे पटले नाही. तिने आपल्या आई-वडिलांकडे जाण्याचा प्रयत्न केला; मात्र तिला स्वीकारण्यास घरातील व्यक्तींनी नकार दिला. त्यामुळे ती निराधार झाली. अशाच परिस्थितीत ती कोल्हापूर येथे बेवारस स्थितीत फिरू लागली. 

दरम्यान, तिचा हा प्रवास लक्षात घेता त्या ठिकाणच्या काही नागरिकांनी याबाबतची माहिती कोल्हापूर पोलिसांना दिल्यानंतर तेथील पोलिसांनी (ता. 12) तिला कोल्हापूर येथील शासकीय तेजस्विनी महिला केंद्रात नेवून ठेवले. त्या ठिकाणी ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले; मात्र त्या ठिकाणी केंद्रात किंवा परिसरात बाळंतपणाची सोय नसल्यामुळे तिला सावंतवाडी येथील अंकुर महिला निवारा केंद्रात दाखल केले. दरम्यान, काल (ता. 17) ती आठ महिन्याची गरोदर असल्यामुळे नियमित तपासणी करण्यासाठी केंद्रातील काळजीवाहू रसिका श्रीराम पेडणेकर या तिला घेऊन येथील कुटिर रुग्णालयात आल्या होत्या. त्यावेळी रुग्णालयात गर्दी असल्यामुळे पेडणेकर यांनी केसपेपर तसेच आवश्‍यक कागदपत्रे जमा करीत असताना आपल्या सोबत कोणीच नसल्याची संधी साधून नेहा हिने पलायन केले. काही वेळाने त्या ठिकाणी कागदपत्रे घेऊन आलेल्या पेडणेकर यांच्या प्रकार लक्षात आला त्यांनी रुग्णालयात शोधाशोध केली; मात्र त्या ठिकाणी त्या मिळून आल्या नाहीत. नेहा ही न सापडल्याने आज अखेर सावंतवाडी पोलिस ठाण्यात तिने पलायन केल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार बेपत्ताची नोंद केली आहे, असे ठाणे अमलदार श्री. गवस यांनी सांगितले. 

निवारा केंद्राची सुरक्षा ऐरणीवर 
शहरातील बस स्थानकाच्या मागे असलेल्या अंकुर निवारा केंद्राची सुरक्षा महिलांच्या दृष्टीने म्हणावी तशी नाही. बरीचशी पदे रिक्त आहेत. तसेच केंद्राची तटबंदी सुद्धा योग्य अशी नाही. त्यामुळे दीड वर्षापूर्वी केंद्रातून एका महिलेने पलायन केले होते. दरम्यान, काही दिवसांनी पुन्हा हा प्रकार घडला आहे. त्यामुळे त्या केंद्रांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Web Title: sawantwadi news women pregnant woman