सावंतवाडी पंचायत समितीचा प्रश्न तात्काळ मिटवण्यात येईल; हसन मुश्रीफ

सावंतवाडी पंचायत समितीचा प्रश्न तात्काळ मिटवण्यात येईल, असे आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी दिले.
Hasan Mushrif
Hasan Mushrifsakal

सावंतवाडी - येथील पंचायत समितीच्या नवीन इमारत आराखड्यास मंजूरी मिळावी, त्याचबरोबर आवश्यक असलेला साडे चौदा कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा, या मागणीसाठी आमदार दिपक केसरकर यांच्यासह माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व उपसभापती शीतल राऊळ यांनी आज राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची मुंबई मंत्रालय येथे भेट घेतली. यावेळी पंचायत समितीचा प्रश्न तात्काळ मिटवण्यात येईल, असे आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी दिले.

सावंतवाडी पंचायत समितीच्या नवीन इमारतीचा प्रश्न गेली कित्येक वर्ष रेंगाळलेला आहे. सुरुवातीला भटवाडी या ठिकाणीही या इमारतीसाठी जागा पाहण्यात आली होती. तर जुन्या इमारतीच्या जागेतच नव्याने इमारती उभारण्याबाबतही प्रयत्न झाले होते; परंतु त्या ठिकाणी आवश्यक जागा नसल्याने आणि भटवाडी येथील जागा ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांसाठी सोयीची नसल्याने याला विरोध झाला होता. त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयासह पाठीमागे असलेल्या जागेमध्ये पंचायत समितीची इमारत उभारण्याबाबत हालचाली झाल्या. याबाबत आवश्यक बाकीचा आराखडा तयार करण्यात आला असून तो मंजुरीसाठी शासन स्तरावर पाठवण्यात आला होता. यासाठी गेली काही वर्ष सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू होते.

Hasan Mushrif
आघाडी न झाल्यास शिवसेना स्वबळावर लढणार; विनायक राऊतांचा इशारा

अलीकडेच आमदार केसरकर यांनी सावंतवाडी पंचायत समितीचा रेंगाळलेला विषय आठ दिवसात मार्गी लावू, असे पत्रकार परिषदेत सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्यासह पंचायत समितीचे उपसभापती शितल राऊळ यांना सोबत घेऊन राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांची मंत्रालय येथे भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत मंत्री मुश्रीफ यांनी हिरवा कंदील दर्शवला असल्याचे उपसभापती राऊळ यांनी सांगितले. याबाबत उपसभापती राऊळ यांना विचारले असता, ते म्हणाले, "नविन इमारतीच्या आराखड्यासह आवश्यक असलेला साडेचौदा कोटी रुपयांचा निधी तात्काळ देण्याचे आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी दिले आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com