सावंतवाडीच्या पाणी प्रश्‍नी मनसेचा आंदोलनाचा इशारा

सावंतवाडीच्या पाणी प्रश्‍नी मनसेचा आंदोलनाचा इशारा

सावंतवाडी - शहरात अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. तर काही ठिकाणी पाण्याची वणवण लागली आहे. बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. शहरात टॅंकरने पाणी पुरवठा करणे हे योग्य वाटत नसून तात्काळ पाण्याच्या समस्या सोडवाव्यात, अन्यथा नागरिकांना घेऊन पालिकेसमोर आंदोलन छेडू, असा इशारा मनसेच्यावतीने मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना देण्यात आला.

गेले महिनाभर शहरामध्ये अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. पाणी येण्याचेही एकच वेळ नसून अनिमितता दिसून येत आहे. नागरीकांना काही भागात अगदी पहाटे 3 वाजता पाणी येते. यामुळे नागरीकांनी झोप घ्यावी की घेवू नये, असा प्रश्‍न उपस्थित होतो. ज्याठिकाणी इमारतीची कामे होत आहेत त्याठिकाणी फोर्सने पाणी कसे येते. नागरीकांना मात्र पाण्याची समस्या निर्माण होत असल्याचे यावेळी कासकर म्हणाले.

शिल्पग्रामच्या वरच्या भागात अगदीच पाणी नसल्यामुळे नागरीकांचे हाल होत आहेत, असे श्री सुभेदार म्हणाले. तर अतुल केसरकर यांनीही आपल्या भागातील समस्या मांडल्या.

यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी आपल्या केबिनमध्ये श्री. आल्मेडा यांना बोलावून ज्या भागात पाण्याच्या समस्या आहेत त्या भागाची नावे लिहून घेवून तेथे कार्यवाही करण्याचे आश्‍वासन यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले.

यावेळी नागरीकांचे पाण्याअभावी मोठे हाल होत असून शहरात टॅंकरने पाणी पुरवठा करणे हे योग्य वाटत नाही. त्यामुळे लवकरात लवकर समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा शहरातील ज्या लोकांना समस्या जाणवत आहेत. त्यांना घेऊन पालिकेसमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी दिला.

यावेळी परिवहन सेनेचे राजू कासकर, मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, मनविसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार, ओमकार कुडतरकर, विनोद पोकळे, अतुल केसरकर, विठ्ठल गावडे, विनय सोनी, ललिता नाईक आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com