कणकवली तालुक्यात शाळांची घंटा वाजली

Schools started in Kankavli taluka
Schools started in Kankavli taluka

कणकवली (सिंधुदुर्ग) - जिल्हातील कनिष्ठ महाविद्याले आणि माध्यमिक विद्यामंदिरातील शाळेची या शैक्षणिक वर्षाची पहीली घंटा आज वाजली. शाळेच्या पहील्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह होता. मार्चपासून शाळेतील मित्र-मैत्रिणींपासून दुरावलेले सोबती आज पुढच्यावर्गात आले; पण वर्गात एका बेंचवर एक विद्यार्थी बसण्याची वेळ कोरोनामुळे आली. शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा विद्यार्थी वर्गाला होती. त्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी संस्था आणि शाळा स्तरावरील सगळ्या उपाययोजना करून मुलांना आज शाळेत प्रवेश देण्यात आला. प्रवेशद्वारावरच मुलांची तपासणी करणत आली. आजपासून 9 ते 12 वर्गातील मुलांच्या शाळा सुरू झाल्या.

कनेडी येथील कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीतील वर्ग सकाळी 8 वाजल्यापासून 11.30 पर्यत भरविण्यात आले. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा सुरू झाली. तर दुपारी 1.30 वाजता दहावीचे वर्ग भरविण्यात आले. सुरूवातीला मुलांचे स्वागत करण्यात आले. मुलांनी तोंडावर मास्क बाधले होते. सॅनिटाझरही करण्यात आले. शाळा प्रशासनाने हात धुण्याची सुविधा पुरवली होती. मुलांना पाणी बॉटल, मास्क, सॅनिटाझर सोबत ठेवणे सक्तीचे होते. पहीला दिवस असल्याने मुलांची हजेरी समाधानकारक होती. कनेडी पंचक्रोशीती काही एसटी बस गाड्या नियमित सुरू न झाल्याने मुलांना शाळेत येता आले नाही. काही पालकांनी मुलांना शाळेत न पाठीविण्याचा निर्णय घेतला; मात्र शाळा प्रशासनाने ऑनलाईन शिक्षण देणे बंद करून शासन आदेशाने शाळांचे 9 ते 12 वी पर्यतचे वर्ग सुरू केले आहेत. 

ऑनलाईनपासून वंचितांना दिलासा 
शाळेचे सत्र सुरू झाले ते ऑनलाईन शिक्षण पध्दतीने; मात्र ग्रामीण भागातील मुलांना ऑनलाईनचा काही फायदा झाला नाही. अनेक मुले मोबाईल हॅन्डसेट नसल्याने तर काही मुले नेटवर्क नसल्याने शिक्षणापासून वंचीत होती. अशा मुलांना आता दिलासा मिळाला आहे. 

अभ्यासात कपात, परीक्षा होणार 
शिक्षण विभागाने नियमित अभ्यासक्रमात 25 टक्के कपात केली आहे. या अभ्यासक्रमावरील ऑनलाईन झालेल्या धड्यांची परीक्षा पहील्या सत्रात झाली. आता दुसऱ्यासत्रात शाळेतील वर्गात शिक्षण पुर्ण झाल्यावर अंतिम परीक्षा घेतली जाणार आहे. 

वर्गातील उपस्थिती महत्त्वाची 
शाळा सुरू झाल्याने प्रत्येक मुलाला त्याची वर्गातील उपस्थितीत म्हत्वाची आहे. दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला यंदा पन्नास टक्के हजेरी ठेवण्यात आली आहे. इतर वर्गातील मुलांना ही पन्नास टक्के हजेरी पुर्ण करावी लागेत. तो विद्यार्थी पुढील वर्गात जाणार आहे. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com