उल्लेखनीय! कोरोनाची साखळी तोडण्यासाठी असा `प्लॅन`, वाचा सविस्तर

नेत्रा पावसकर
Saturday, 22 August 2020

कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्राला मिळत असल्याने यावर्षी सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे. त्यातही कोकणातील गणेशोत्सव म्हणजे उत्साहाला उधाण असते आणि प्रत्येकजण आनंदात असतो.

तळेरे (सिंधुदुर्ग) - गणेश मूर्ती घेवून जाताना गर्दी होऊ नये, यासाठी गणेश मुर्तीकारांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विशेष नियोजन केलेले दिसून आले. त्यासाठी यावर्षी शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. त्यासाठी परिसरानुसार प्रत्येकाला गणेश चतुर्थीपुर्वी तीन दिवस अगोदर वेळ ठरवून देण्यात आली. 

वाचा - अनाथांच्या नाथा तुज नमो; देवरुखात या दहा मुली साजरा करणार दिड दिवसांचा गणेशोत्सव 

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आता गणेश मूर्तीकारांनीही यावर्षी खबरदारी घेतलेली दिसून आली. सामाजिक अंतर राखण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी मूर्तीकार यांनी गणेश भक्तांना चतुर्थीच्या आधी तीन दिवस वेगवेगळ्या वेळा ठरवून दिल्या आणि त्याप्रमाणे गणपती गणेश भक्तांनी आपाअपल्या घरी घेउन गेले. कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्राला मिळत असल्याने यावर्षी सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे. त्यातही कोकणातील गणेशोत्सव म्हणजे उत्साहाला उधाण असते आणि प्रत्येकजण आनंदात असतो.

यावर्षी मात्र कोरोनामुळे काही प्रमाणात त्यावर विरजण पडले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी ती मजा अनुभवता येणार नाही. सर्वत्र गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. गणेश मूर्ती शाळा म्हणजे विविध ठिकाणावरून लोक येत असतात. त्यामुळे गर्दीही होण्याचा संभव नाकारता येत नाही. यावर उपाय म्हणून साळीस्ते येथील गणेश शाळेत गणेश चतुथीपुर्वी तीन दिवस वेगवेगळी वेळ देण्यात आली. 

हेही वाचा - Good News - रत्नागिरीत केंद्राच्या या स्कीमचा हजारो उद्योजकांना फायदा -

योग्य नियोजन 
मूर्तीकार विजय मेस्त्री म्हणाले, ""यंदा कोरोनाच्या हद्दपारीसाठी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले. त्याचे योग्य नियोजनही केले. मूर्ती न्यायला येणाऱ्यांना चतुर्थीपुर्वी तीन दिवस वेगवेगळ्या वेळा दिल्या. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांसाठी एक दिवस, गावाबाहेरून येणाऱ्यांसाठी एक दिवस आणि गावातील काहींना आदल्या दिवशी तर उरलेल्यांना चतुर्थीदिनी वेळ दिली आहे. त्यामुळे तीन दिवसांपासून भक्त आनंदाने मूर्ती घेउन जात आहेत. त्यामुळे एकाच दिवशी होणारी गर्दी टळली.

संपादन - राहुल पाटील 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sculptor alerted by corona konkan sindhudurg