महाड - घाटमार्गाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर

road.
road.

महाड - पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर झालेल्या बस दुर्घटनेमुळे रस्ता सुरक्षा व घाटमार्गाच्या सुरक्षीततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मार्गाच्या चौपदरीकणाच्या कामाचा प्रस्ताव महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे प्रलंबित असून, त्याची युध्दपातळीवरून अंमलबजावणी करण्याची गरज या अपघातामुळे निर्माण झाली आहे. या रस्त्यावर संरक्षक कठचे अनेक ठिकाणी आहेत परंतु नेमकी ही बस जेथून खाली गेली येथे कोणत्याही प्रकारचे संरक्षक कठेडे नव्हते..

दापोलीच्या कोकण कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना सहलीसाठी महाबळेश्वरला घेऊन जाणारी बस आंबेनळी घाटाच्या दरीमध्ये कोसळून झालेल्या दुर्घनेटनेत 30 कर्मचाऱी म्रुत्युमुखी पडले. मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर पासुन पुणे बंगलोर महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील दहीवडी (राज्यमार्ग क्र. 139) हा मार्ग कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा मार्ग आहे. परंतु, या घाटमार्गावर नियमितपणे घडणाऱ्या अपघातांमुळे हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. पोलादपूर, महाबळेश्वर,  पाचगणी, वाई ते दहीवडी पर्यंतच्या या नव्वद किमी मार्गाच्या चौपदरीकणाच्या कामाचा प्रस्ताव महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे प्रलंबित असून, त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे. या मार्गाला अन्य पर्याय नाही. पोलादपूर ते आंबेनळी हा 24 किमी रस्ता महाड विभागाच्या अखत्यारीत आहे. तर त्यापुढील दहीवडी पर्यंतचा मार्ग सातारा बांधकाम विभागाकडे आहे. महाड विभागाने आपल्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याचे तीन महिन्यापूर्वी डांबरीकरणाचे काम केले. तरी अरुंद मार्ग तसेच धोकादायक वळणांमुळे हा घाटमार्ग प्रवाशांच्या जीवावर बेतला आहे. या घाटात वळणावर संरक्षक कठटे असले तरी दरीच्या भागात संरक्षक कठड्यांचे काम बाकी आहे.

वाहनांच्या अपघातांसह या मार्गावर दरडी कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होतो. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. काल घडलेल्या बस दूर्घटनेनंतर तरी या मार्गाच्या रूंदीकरणासाठी वा सुरक्षीततेसाठी शासनाने पावले उचलावी अशी मागणी केली जात आहे.

येथे सांभाळा
बाहूली टोक, दाभीळ टोक, दाभीळ कॅार्नर, रेडका धबधबा, चिरेखिंड अरुंद काँर्नर अशी धोकादायक ठिकाणे आहेत. अनेक धोकादायक वळणाच्या ठिकाणी रस्ता, तसेच धबधब्या ठिकाणी मोरी रुंदिकरण करण्यात आलेले आहेत. 

या घाटात धोकादायक ठिकाणी संरक्षक कठेडे व रेलिंग बसवलेली आहेत. अपघातस्थळाचा रस्ता सरळ असल्याने येथे कठडे नव्हते. परंतु कठडे बसवणे सुरु राहणार आहे या मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून केले जात आहे.
- अरुण देवकाते ( उपअभियंता,सा.बा,विभाग पोलादपूर)

राज्यातील प्रमुख रस्त्यांचे महामार्गात रुपांतर करण्याचा तसेच रुंदिकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. पोलादपूर महाबळेश्वर मार्गही महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे देण्याता प्रस्ताव असुन त्याबाबत आपण संबंधीत यंत्रणेकडे पाठपुरावा करु  तसेच अपघातस्थळी सुरक्षा असावी या बाबतही दक्षता बाळगण्याबाबत सुचना केल्या जातील
- भरत गोगावले ( आमदार,महाड)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com