काही सुखद ! बच्चे कंपनीने बनवले सीड बॉल

Seed Ball Made By Children Lence Art Company Appeal
Seed Ball Made By Children Lence Art Company Appeal

रत्नागिरी - लेन्स आर्ट या रत्नागिरीतील फोटोग्राफी व पर्यावरणविषयक काम करणाऱ्या संस्थेच्या आवाहनानुसार गणेशगुळे येथील बच्चे कंपनीने सीडबॉल बनवले आहेत. जांभळाच्या बिया मातीमध्ये घालून त्याचे लहान लहान सीडबॉल बनवून विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावला आहे. कोरोनामुळे लोकडाऊनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी आपला वेळ अभ्यासासोबत चांगल्या उपक्रमासाठी वापरला आहे. 

25 मार्चपासून भारतात सर्वत्र कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत होते. जिल्हा परिषद शाळा व खासगी शाळांनी आपले निकालही जाहीर केले आहेत. यंदा प्रथमच वार्षिक परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांना घरी बसून काय करावे, असा प्रश्न पडला होता.

त्याच दरम्यान, लेन्स आर्ट या संस्थेने विद्यार्थ्यांना व ज्येष्ठ मंडळींना पर्यावरण रक्षणासाठी सीड बॉल बनण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत रत्नागिरी तालुक्‍यातील गणेशगुळे गावातील चैत्राली पटवर्धन, सानिका पटवर्धन आणि अर्णव पटवर्धन या बच्चे कंपनीने जांभळाच्या बिया गोळा केल्या. 

लाल माती भिजवून त्याचे गोळे करण्यात आले. या गोळ्यांमध्ये जांभळाच्या बिया काढण्यात आल्या. असे दीडशे गोळे बनवण्यात आले आहेत. जूनमध्ये पाऊस सुरू झाला की हे गोळे मोकळ्या जागी रानमाळावर व बागांमध्ये फेकण्यात येणार आहेत. त्यामुळे जांभळाची रोपे तयार होतील व एक प्रकारे वृक्षारोपण होईल. 

आजी-आजोबा, आई-वडील व काका-काकू.. 
पर्यावरण रक्षणाचा संस्कार लहानपणापासूनच व्हावा, याकरिता विद्यार्थ्यांना याचा उपयोग होणार आहे. शेतीचा संस्कारही यातून होईल. कारण माती खणण्यापासून, ती पाण्यात भिजवून गोळे करण्यापर्यंतचे सर्व काम या मुलांनीच केले आहे. याकरिता त्यांना आजी-आजोबा, आई-वडील व काका-काकू यांचे मार्गदर्शन लाभले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com