esakal | मी नक्की बरी होणार ; मानसिक आरोग्याने कॅन्सरवर मात
sakal

बोलून बातमी शोधा

self confidence helps to fight against cancer information given by a women in ratnagiri

मी नक्की बरी होणार, हा आत्मविश्वास ठेवला. गंभीर दुखणे झाले असे मानले नाही. माझे मानसिक आरोग्य उत्तम ठेवले.

मी नक्की बरी होणार ; मानसिक आरोग्याने कॅन्सरवर मात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साडवली : कॅन्सर कोणकोणत्या प्रकारचे असतात व मला झालेला स्तनाचा कर्करोग नक्की बरा होणार, हा आत्मविश्वास ठेवला. तो १०० टक्के बरा होईल की नाही, त्याचे परिणाम काय होतात याची काहीच माहिती नव्हती. मी डॉक्‍टरांकडून त्याविषयी सर्व माहिती करून घेतली. डॉक्‍टरांवर पूर्ण विश्वास ठेवून उपचार घेतले. मी नक्की बरी होणार, हा आत्मविश्वास ठेवला. गंभीर दुखणे झाले असे मानले नाही. माझे मानसिक आरोग्य उत्तम ठेवले. नातेवाइकांनाही माझ्या वागणुकीतून धीर दिला. कोणत्याही आजारात मानसिक आरोग्य चांगले ठेवले तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसतात, हे स्वानुभवाने सांगते, असे ठाम प्रतिपादन वृषाली देव यानी केले.

हेही वाचा - माझे कुटूंब माझी जबाबदारी ; कोकणात खेर्डीमध्ये आरोग्याबाबत होतोय जागर 

स्तनाचा कर्करोग महिलांमध्ये सर्वात सामान्य कर्करोग आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेन्शनच्या अहवालानुसार आपल्या देशात या केसेस जलद वाढत आहेत. काही स्त्रियांनी या दुर्धर रोगाचा सामना केला. त्या निरामय जीवनाचा आनंद घेत आहेत. ‘संवाद कॅन्सरग्रस्तांशी’ या उपक्रमांतर्गत लायन्स अध्यक्षा अदिती भावे, सेक्रेटरी माया गोखले यांनी देवरूख येथील सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षिका वृषाली देव यांच्याशी गप्पा मारल्या. देव यांनी असे सांगितले की, मला कर्करोग झाला. त्याला २० वर्षे होऊन गेली. आता मी त्यातून बाहेर पडून पूर्ण बरी झाले आहे. 

वेळीच काळजी घ्या

माझ्या सहा केमोथेरपी होऊन जेव्हा मी बरी झाले, तेव्हापासून मी पूर्वीसारखे माझे आयुष्य जगू लागले. प्रत्येक स्त्रीने आपल्या वयाच्या चाळीशीनंतर सर्व शारीरिक तपासण्या करून घ्याव्यात. वेळीच काळजी घेतली तर आरोग्यसंपन्न जगता येईल.

हेही वाचा -  ऑनलाइन शिक्षणात रेंजचा अडथळा ; कोकणात विद्यार्थ्यांना मिळतोय माळरानाचा आधार 

संपादन - स्नेहल कदम