esakal | पिवळा मळा नादखुळा ; पिवळ्या धमक हातांनी उघडली प्रगतीची कवाडे
sakal

बोलून बातमी शोधा

self group 150 families women participated turmeric crop and increase this year production in ratnagiri

गतवर्षी लागवडीच्या क्षेत्राच्या तुलनेमध्ये यावर्षी सुमारे तीन हेक्‍टरने लागवडीच्या या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे.

पिवळा मळा नादखुळा ; पिवळ्या धमक हातांनी उघडली प्रगतीची कवाडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर : सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या तालुक्‍यातील सुमारे दीडशेहून अधिक बचत गटांनी सुमारे सात हेक्‍टरवर हळद लागवड केली आहे. गतवर्षी लागवडीच्या क्षेत्राच्या तुलनेमध्ये यावर्षी सुमारे तीन हेक्‍टरने लागवडीच्या या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. या लागवडीमध्ये बचत गटाच्या माध्यमातून सुमारे चारशे महिला कुटुंबे सहभागी झाली आहेत. 

लहरी पाऊस, बदलते वातावरण, खर्चापेक्षा उत्पन्न कमी, माणसांची कमतरता आदी विविध कारणांमुळे शेतकऱ्यांकडून शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष होवू लागले आहे. सहकाराच्या धर्तीवर गठीत झालेल्या बचत गटांमधील महिला शेतीला पुन्हा नव्याने उर्जितावस्था देताना उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. त्यातून तालुक्‍यातील सुमारे दीडशेहून अधिक बचत गटांनी सुमारे सात हेक्‍टरवर हळद लागवड केली आहे. 

हेही वाचा - गस्त प्रभावी होणार का ? कोकणात मच्छीमारांसमोर उभा आहे प्रश्न

हळदीच्या सेलम जातीच्या लागवडीसाठी पोषक आहे. त्यामुळे तालुक्‍यातील दीडशेहून अधिक बचत गटांनी सेलम जातीच्या हळदीची लागवड केली आहे. त्यामध्ये चारेशहून अधिक महिलांची कुटुंबे सहभागी झाली आहेत. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी हळद लागवडीच्या क्षेत्रामध्ये अधिक वाढ झाली आहे. तालुक्‍यामध्ये महिलांनी केलेली हळदीची लागवड चांगली झाली असून त्यातून हळदीचा सुगंध अधिकच दरवळू लागला आहे.

त्याद्वारे बचत गटांच्या महिलांनी या शेतीच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्नाचा नवा आणि शाश्‍वत स्त्रोत शोधला आहे. त्यासाठी त्यांना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील, जिल्हा अभियान सहसंचालक नितीन माने, जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर, तालुका अभियान व्यवस्थापक साक्षी वायंगणकर, तालुका व्यवस्थापक अवधूत टाकवडे, अमित जोशी यांनी मार्गदर्शन करीत प्रोत्साहित केले. प्रभाग समन्वयक प्राजक्ता कदम, ओंकार तोडणकर, मंदार पवार यांच्यासह प्रभागसंघ व्यवस्थापक यांनीही सहकार्य केले.

हेही वाचा -  कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर संबंधितावर होणार सिंधुदुर्गनगरीतच  होणार अंत्यसंस्कार 

सात हेक्‍टरवर चारसूत्री भातशेती

हळदीच्या लागवडीच्या जोडीने सुमारे सात हेक्‍टर क्षेत्रावर बचत गटाच्या महिलांनी पारंपरिक आणि चारसूत्री पद्धतीने भातशेती केली आहे. त्यामध्ये पाचशेहून अधिक कुटुंबे बचत गटाच्या माध्यमातून सहभागी झाली आहेत. पन्नासहून अधिक गटांनी झेंडूच्या फुलांचीही लागवड केली आहे.

संपादन - स्नेहल कदम