esakal | एसटी सावरतीये ; शासकीय वाहनांसाठी आता एसटीचे चालक
sakal

बोलून बातमी शोधा

service provided by a state transport services to government in ratnagiri as a driver

आता शासकीय वाहनांची दुरुस्ती एसटीच्या वर्कशॉपमध्ये होणार आहे.

एसटी सावरतीये ; शासकीय वाहनांसाठी आता एसटीचे चालक

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : कोरोना महामारीमुळे एसटीचा आर्थिक पाय आणखी खोलात गेला. यातून सावरण्यासाठी एसटी महामंडळाने पर्याय काढत माल वाहतूक सुरू केली. त्यापुढे जात आता शासकीय वाहनांची दुरुस्ती एसटीच्या वर्कशॉपमध्ये होणार आहे.

तसेच गरजेनुसार एसटीचे चालक शासकीय वाहने चालविण्यासाठी उपलब्ध करून देण्याची महामंडळाने तयारी केली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्ह्यांचा सर्व्हे करण्याचे आदेश देण्यात आले असून, तसा अहवाल महामंडळाला दिला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा 
पाटबंधारे, कृषी विभाग अशा सर्व शासकीय कार्यालयातील वाहनांच्या देखभालीची जबाबदारी घेण्याची तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा - गोळवणचा बेपत्ता मुलगा सहा वर्षांनी सापडला -

त्यानुसार शासकीय वाहनांचा सर्व्हे सुरू झाला आहे. शासकीय कार्यालयांना भेटी देऊन त्यांची वाहने कोणत्या कंपनीची आहेत, दुरुस्तीवर होणारा खर्च किती असेल यासह विविध बाबींचा सर्व्हे दहा दिवसांत पूर्ण केला जाणार आहे. तो अहवाल महामंडळाला पाठविला जाईल. त्यानंतर यावर निर्णय होईल, अशी माहिती वाहतूक अधिकारी अनिल म्हेत्तर यांनी ‘सकाळ’ला दिली.

अडचणींचा डोंगर...

- कोरोना महामारीमुळे चालक, वाहक आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराची परवड 
- अजूनही सुमारे ६० टक्के कर्मचाऱ्यांना पुरेसा पगार नाही
- राज्य शासनाकडील एसटीच्या थकीत देण्यावरच कर्मचाऱ्यांचे फक्त जुलैपर्यंतचेच पगार 
- ऑगस्ट, सप्टेंबरचा पगार अद्यापही थकीत 
- कोरोना महामारीमुळे प्रवाशांची एसटीकडे पाठ
- एकूणच एसटीला सहन करावा लागतोय मोठा तोटा

हेही वाचा -  बांदा-शिरोडा मार्ग धोकादायक -

संपादन - स्नेहल कदम 
 

loading image
go to top