सात नगरसेवक पक्षप्रवेश शक्यतेने वैभववाडीत वातावरण तापले ; गोपनीय बैठका सुरू

seven corporator joining shiv sena party heated up the atmosphere in Vaibhavwadi sindhudurg political news marathi
seven corporator joining shiv sena party heated up the atmosphere in Vaibhavwadi sindhudurg political news marathi

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : वाभवे वैभववाडी नगरपंचायतीतील भाजपाचे सात नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार या शक्यतेने शहरातील वातावरण चांगलचे तापले आहे.शहरातील प्रत्येक नाक्यावर नगरसेवक पक्षप्रवेशाचीच चर्चा सुरू असुन राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काल ता.८ रात्रीपासुन गोपनीय बैठकांचा धडाका सुरू केला आहे. या नगरसेवकांनी प्रवेश केल्यानंतर शिवसेनेकडुन स्वागताची तर भाजपाकडुन त्यांचे मुल्य कमी करण्याची रणनिती आखली जात असल्याची चर्चा सुरू आहे.

वाभवे वैभववाडी नगरपंचायतीत भाजपाचे १७ पैकी १७ नगरसेवक आहेत.त्यापैकी सात नगरसेवकांनी भाजपाच्या प्राथीमक सदस्यात्वाचा राजीनामा दिला आहे. हे सर्व नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.आज  सायकांळी ६ वाजता हा पक्षप्रवेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर होईल असे सांगीतले जात आहे.शिवसेनेकडुन त्याला अधिकृत दुजोरा दिला जात आहे. त्या सात नगरसेवकांनी दिलेला राजीनामा आणि ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता यामुळे जिल्हयातील वातावरण ढवळुन निघाले आहे.

दरम्यान त्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जल्लोष करून शहरातील वातावरण शिवसेनामय करण्याचा शिवसेनेच्या गोटातुन तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.तर भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी काल रात्रीपासुन गोपनीय बैठकांचा धडाका सुरू केला आहे. शहरातील काही लोकांशी या राजीनामा नाट्यावर चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय जर पक्षप्रवेश झाला तर त्याला अवाजवी मुल्य देण्यात येवु नये अशी रणनिती भाजपाने आखल्याची चर्चा आहेदोन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकमेकांच्या राजकीय हालचालीवर नजर ठेवुन आहेत.या घडामोडीनंतर राजकीय नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटु लागल्या आहेत. आमदार नितेश राणे यांनी हे व्हॅलेटियन डे च गिफ्ट मुख्यमंत्र्याना देत असल्याची प्रतिक्रिया नोंदविली आहे.

आमदार नितेश राणे यांच्या कार्यपध्दतीला कंटाळुन सात नगरसेवक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. यामध्ये तीन नगराध्यक्ष, एक उपनगराध्यक्ष आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते सतिश सावंत यांनी दिली आहे.तर भाजपाचे राजन तेली यांनी वाभवे वैभववाडी नगरपंचायतीतील १७ ही नगरसेवक सध्या भाजपाचे होते.परंतु आता पक्षाचा राजीनामा दिलेल्या सात नगरसेवकांपैकी ३ नगरसेवक अपक्ष म्हणुन निवडुन आलेले होते.याशिवाय एक नगरसेवक शिवसेनेचाच होता.या नगरसेवकांमध्ये पुन्हा उमेद्‌वारी हवी होती.परंतु भाजप त्यांची मागणी पुर्ण करू शकत नव्हता त्यामुळे त्यांच्यात चलबिचल होते.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com