esakal | रत्नागिरीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; सांगलीचा संशयित अटकेत
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; सांगलीचा संशयित अटकेत

रत्नागिरीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; सांगलीचा संशयित अटकेत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

रत्नागिरी : शहरालगतच्या नाचणे रोड (ratnagiri) येथे सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा (sex racket) शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. आयटीआयजवळील एका बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये मुलींना बेकायदेशीररित्या ठेऊन हा वेश्या व्यवसाय सुरू होता. या प्रकरणी वाळवा (जि. सांगली) (sangli) येथील एका व्यक्तीला पोलिसांनी (police) अटक केली तर पीडित मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी बनावट कस्टमर पाठवून हे रॅकेट उघड केले. नाचणे रोडवरील आयटीआयजवळील (ITI) एका बिल्डिंगच्या एका फ्लॅटमध्ये मुलींना बेकायदेशीर ठेऊन, गिऱ्हाईक आणून, वेश्या व्यवसाय चालू आहे, अशी बातमी रत्नागिरी शहर पोलिसांना मिळाली होती. पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक अनिल लाड, पोलिस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांना सोबत घेऊन धाड टाकण्याचा निर्णय झाला; मात्र बातमी खरी आहे का, याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक पाठविले.

हेही वाचा: रत्नागिरीत होणार आता PCV चे लसीकरण; महिन्याला मिळणार लस

बोगस गिऱ्हाईकाकडून या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाली. पोलिसांनी सापळा रचून पंचासह छापा टाकला. त्या वेळी तिथे एक पीडित मुलगी व तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणारा असे दोघेजणआढळले. चौकशीत त्याचे नाव रावसाहेब जगन्नाथ माळी (वय ४२, रा. भेकराईनगर, बसस्टॉप शेजारी, ता. हवेली, जि. पुणे) (मूळ रा. कासेगांव, ता. वाळवा, जि. सांगली) असे निष्पन्न झाले. एका स्त्री साथीदारासह स्वत:च्या मुलींना बेकायदेशीररित्या आणून व गिऱ्हाईक आणून वेश्या व्यवसाय करीत असल्याची माहिती उघड झाली.

पोलिसांनी रावसाहेब माळी व एक स्त्री साथीदारा विरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात कलम ३७०, ३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करून रावसाहेब माळी याला अटक केली. पीडित मुलीस महिला पोलिस अधिकारी व स्टाफ यांनी संरक्षण कामी ताब्यात घेतले. निरीक्षक लाड यांच्याबरोबर सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. एस. भोसले, पोलिस उपनिरीक्षक मेहेर, हवालदार जाधव, नार्वेकर, सावंत, सावंत, गुरव, नाटेकर, मलबारी या पथकाने कारवाई केली.

हेही वाचा: 'कर्तृत्व’ कुठे कमी पडले ? ऐतिहासिक निकालात 20 जणांच्या दांड्या

loading image