फलोत्पादन, मच्छीमारीसाठी महत्त्वाचे निर्णय आवश्‍यक - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

सावर्डे - ‘‘कोकण विकासासाठी फलोत्पादन आणि मच्छीमारी व्यवसायाला चालना देण्यासाठी आणखी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची आवश्‍यकता आहे,’’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथे व्यक्त केले. सावर्डे येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

सावर्डे - ‘‘कोकण विकासासाठी फलोत्पादन आणि मच्छीमारी व्यवसायाला चालना देण्यासाठी आणखी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची आवश्‍यकता आहे,’’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथे व्यक्त केले. सावर्डे येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

बरीच वर्षे सरकारमध्ये काम केले. मी काही निर्णय घेतले. त्या निर्णयाचे काय झाले? हे जाणून घेण्याची सवय माझ्यासारख्याला असल्याने राज्यभर फिरताना बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. राजकारणविरहित कोकणचा दौरा असल्याचेही पवार यांनी नमूद केले. 

श्री. पवार म्हणाले, की सरकारी कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते. मात्र, सामान्यांना तत्कालीन निर्णयाचा लाभ किती झाला, हे बऱ्याचदा जाणून घेण्याची मला उत्सुकता असते. कोकणात फलोत्पादन व फिशरीज या दोन क्षेत्रांत फरक पडला का?, लोकांचे काही प्रश्‍न आहेत का? त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेता आल्या. आंब्यावर प्रक्रिया, शैक्षणिक संशोधन केंद्र, शेतकरी, शास्त्रज्ञ यांनी काही शिफारशी केल्या. त्या मी समजून घेतल्या. २० वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेच्या निर्णयातील कलमे बदलण्याची वेळ आली. सरकार त्याबाबत पावले उचलेल. रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांमधील मच्छीमार व्यावसायिकांनी काही प्रश्‍न मांडले. या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी केंद्रीय मंत्री व सरकारसोबत चर्चा करावी लागणार आहे. या वेळी आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, बाबाजी जाधव आदी उपस्थित होते. 

डिझेलमध्ये सवलत दिली पाहिजे  
कोकणातील मच्छीमारीच्या दुष्काळावर पवार म्हणाले, की रेझिंग काळात मच्छीमारीला बंदी घातली जाते. त्याबाबत लोकांच्या तक्रारी आहेत. काही गोष्टी नैसर्गिक घडल्या पाहिजेत. निर्धारित क्षेत्राच्या आत मच्छी चांगली मिळते. त्यासाठी साधनेही सक्षम असायला हवीत. तसेच सरकारने डिझेलमध्ये सवलत दिली पाहिजे. दरम्यान, रत्नागिरी दौऱ्यावर पवार यांनी कोणतेही राजकीय भाष्य केले नाही. मात्र, चर्चा करीत असताना खोलीचा दरवाजा बंद केला, की ‘बंद दरवाजाआड चर्चा’ असे छापून येते, हे मिश्‍कीलपणे नोंदविले.

Web Title: Sharad Pawar comment