शरद पवार यांनी घेतली नारायण राणे यांची भेट

तुषार सावंत
सोमवार, 3 डिसेंबर 2018

कणकवली - मी सिंधुदुर्गात आलो होतो. यावेळी नारायण राणेंनी मला फोन केला म्हणून मी मुंबईला जाता जाता त्यांच्या भेटीला आलो. ते आमचे जुने सहकारी आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. 

कणकवली - मी सिंधुदुर्गात आलो होतो. यावेळी नारायण राणेंनी मला फोन केला म्हणून मी मुंबईला जाता जाता त्यांच्या भेटीला आलो. ते आमचे जुने सहकारी आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांच्या कणकवलीतील आेम गणेश निवासस्थानी दोन वाजता श्री पवार यांचे आगमन झाले. श्री पवार गेले दोन दिवस जिल्हा दौर्‍यावर आहेत. आंबोली, मालवण, वेंगुर्ला येथे बैठका झाल्यानंतर आज श्री पवार हे कणकवलीत आले. राणेंच्या घरात पाहुणचार असल्याने या भेटी मागील नेमके रहस्य काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला मात्र पाहुणचारानंतर माध्यमांना सामोरे जाताना श्री पवार यांनी गुगली टाकत तुम्हाला चाय पे कोणती चर्चा मिळणार नाही आमची भेट ही मैत्रीच्या संबंधी होती. त्यामुळे उलट सुलट काही छापू नका असेही सांगायला श्री पवार विसरलेले नाहीत.

हा पाहुणचार असला तरी यामागे राजकीय गुपिते आणि गणिते निश्चितच दडलेली आहेत. पवार आणि राणे हे अलीकडे फारच जवळ येऊ लागले आहेत. याच वर्षी राणेंच्या मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे उद्घाटन दस्तुरखुद्द श्री पवार यांच्या हस्ते झाले होते. यांच्या महत्त्वाच्या प्रकल्पांना श्री पवार यांनी आजवर साथ दिली आहे. मात्र राजकारणात हे दोघे फारसे जवळ नव्हते. मैत्री असली तरी विचार भिन्न होते, पण देशात आणि राज्यात बदललेली राजकीय गणिते यात श्री राणे यांची असलेली राजकीय वेगळी ताकद पवारांना कदाचित या खेपेस फायदेशीर ठरेल, असा या भेटी मागचा हेतू असावा.

कोकणात श्री राणे यांची स्वाभिमान पक्षाची ताकद काही प्रमाणात टिकून आहे या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस पीछेहाट होत आहे पक्षाला बळ देण्यासाठी आगामी राजकीय रणनीती या चर्चेमागे असावी असेही बोलले जात आहे

Web Title: Sharad Pawar meets Narayan Rane in Kankavali