अलिबागमध्ये शेकापचे वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

स्थायी, आरोग्य, स्वच्छता, महिला व बालकल्याण समिती बिनविरोध...

अलिबाग - अलिबाग नगरपालिकेतील सर्व विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड झाली. नगरपालिकेतील विशेष समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांसाठी बुधवारी (ता. ४) विशेष सभा घेण्यात आली. यामध्ये सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत नामनिर्देशनपत्रे भरण्यासाठी वेळ देण्यात आला होता.

विविध समित्यांसाठी विजय झुंजारराव, मानसी म्हात्रे, राकेश चौलकर, वृषाली ठोसर, सुरक्षा शहा यांनी अर्ज दाखल केले होते; तर स्थायी समितीच्या सभापतिपदी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची निवड झाली. अलिबाग नगरपालिकेत सर्व नगरसेवक शेतकरी कामगार पक्षाचे असल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. या वेळी समित्यांच्या सदस्यांचीही निवड करण्यात आली. समित्यांनुसार निवड झालेले सभापती व सदस्य पुढीलप्रमाणे : वीज व सार्वजनिक बांधकाम समिती - विजय झुंजारराव (सभापती). सदस्य - प्रदीप नाईक, संजना कीर, अनिल चोपडा, सुषमा पाटील. स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती - मानसी म्हात्रे (सभापती). सदस्य - उमेश पवार, गौतम पाटील, प्रदीप नाईक, विनोद सुर्वे.

पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती - राकेश चौलकर (सभापती). सदस्य - गौतम पाटील, शैला भगत, राजेश्री पेरेकर, महेश शिंदे.
महिला व बालकल्याण समिती - वृषाली ठोसर (सभापती), संजना कीर, प्रिया घरत, नईमा सय्यद, अश्विनी पाटील. नियोजन व पर्यटन विकास समिती - सुरक्षा शहा (सभापती). सदस्य - चित्रलेखा पाटील, उमेश पवार, अनिल चोपडा, महेश शिंदे, अश्विनी पाटील. स्थायी समिती - प्रशांत नाईक (सभापती). सदस्य - विजय झुंजारराव, मानसी म्हात्रे, राकेश चौलकर, वृषाली ठोसर, सुरक्षा शहा.

Web Title: shekap party power in alibag