मेंढपाळ परतीच्या मार्गावर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

रसायनी - पावसाळा जवळ येत असल्याने घाटमाथ्यावरून इकडे चाऱ्याच्या शोधात आलेले मेंढ्यांचे कळप परतीच्या प्रवासाला लागले आहेत. बोरघाटानजीकच्या खालापूर तालुक्‍यात ते गोळा होऊ लागले आहेत. 

रसायनी - पावसाळा जवळ येत असल्याने घाटमाथ्यावरून इकडे चाऱ्याच्या शोधात आलेले मेंढ्यांचे कळप परतीच्या प्रवासाला लागले आहेत. बोरघाटानजीकच्या खालापूर तालुक्‍यात ते गोळा होऊ लागले आहेत. 

दुष्काळसदृश्‍य परिस्थिती, त्यामुळे उद्‌भवणारी चारा व पाणी टंचाई लक्षात घेता दर वर्षी देशावरील मेंढपाळ चाऱ्याच्या शोधात कोकणात येतात. दसरा झाल्यानंतर हे कळप बोरघाट उतरून कोकणात येतात. या वर्षी देशावर चांगला पाऊस झाल्याने हे कळप थोडे उशिरा आले होते. खालापूर, कर्जत, पनवेल, उरण आदी तालुक्‍यांत हे कळप फिरतात. ज्यांच्या शेतात कळप वस्तीला थांबतात, त्या जमीन मालकाकडून चारा किंवा पैसे मोबदल्यात मिळतात, असे चंद्रकांत मोते याने सांगितले. पाऊस आला तर बोरघाट चढून झटपट गावाकडे जाण्याच्या सोईसाठी हे कळप खालापूर तालुक्‍यात आठ-दहा किलोमीटर अंतराच्या आसपास थांबतात. 

Web Title: Shepherd on the return