शेतकरी विकास सामाजिक संस्थेचा रविवारी लाँग मार्च 

लक्ष्मण डुबे 
गुरुवार, 5 एप्रिल 2018

रसायनी(रायगड) - प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्था रसायनी यांनी एचओसी कंपनी समोर प्रलंबीत मागण्यांकरिता धरणे आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, आजुनही आंदोलनाची सरकारने दखल न घेतल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे रविवार (ता 08) व सोमवार (ता 09) रोजी सीबीडी बेलापुर येथील विभागीय आयुक्त कोकण भवन कार्यालयावर रसायनी येथुन पायी मोर्चा नेण्याचा इशारा संस्थेने दिला आहे. काल (बुधवार) पनवेल येथे प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत मोर्चा काढु नका सरकारचे म्हणणे होते. मात्र याला प्रकल्पग्रस्तांनी नकार दिला आहे. 

प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्था मागील बारा वर्षा पासुन एचओसी प्रकल्पग्रस्ताच्या मागण्या बाबत पाठपुरावा करत आहे. मागण्यांबाबत शासन स्तरावर चर्चा बैठका झाल्या आहेत. मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे तोडगा निघालेला नाही आसा आरोप प्रकल्पग्रस्त करत आहे. तर प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्थेने गुरुवार (ता 23) मार्च पासुन कंपनीच्या प्रवेश व्दारा समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनचा सोळावा दिवस आहे. कंपनीने न वापरलेली जमीनी शेतक-यांना परत मिळाव्यात आणि कंपनीला शासनाने जमीन विक्रीला दिलेली परवानगी रद्द करावी आदि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आहे. 

दरम्यान, बुधवार (ता 04) पनवेल येथील कार्यालयात उपविभागीय आधिकारी दत्तात्रेय नवले यांनी बैठक बोलविली होती. या बैठकीला अध्यक्ष तात्यासाहेब म्हसकर, उपाध्यक्ष रमेश पाटील, सरचिटणीस काशीनाथ कांबळे, सहसचिव समीर खाने आदि उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या पदाधिकारी यांनी आंदोलन स्थळी येऊन बोलणी करावी आशी मागणी केली. तर मोर्चाचा निर्णय मागे घ्या, मागण्यां बाबत चर्चा करून सोडविण्यात येतील आशी भूमिका उपविभागीय आधिकारी यांनी मांडली. असे सांगण्यात आले. आतापर्यंत अनेकदा बैठका झाल्या मात्र निर्णयाची अंमलबजावणी सरकारने केली नाही. त्यामुळे  प्रकल्पग्रस्तांची फसवणुक होत आहे. आता मोर्चाचा निर्धार कायम असल्याचे समीर खाने यांनी सांगितले. 

लाँग मार्च रविवार (ता 08) रोजी रसायनी वरून निघणार आसुन पनवेल येथे मुक्कामा नंतर सोमवारी (ता 09) रोजी सकाळी साडेदहा वाजता सीबीडी येथील विभागीय आयुक्त कार्यालया समोर पोहोचेल असे खाने यांनी सांगितले. 

खालापुर तालुक्यातील वासांबे मोहोपाडा, नवीन पोसरी, शिवनगर, रीस, कळणाचीवाडी, खाने आंबिवली, आळी आंबिवली, चांभार्ली, पराडे, तसेच पनवेल तालुक्यातील सावळे, देवळोली, जाताडे, जुनी पोसरी, तुराडे, दापिवली, वावेघर आदि गावं एचओसी प्रकल्पग्रस्त आसुन गावांतील शेतकरी आणि कुंटूंबीय तसेच बाजुच्या इतर गावांतील ग्रामस्थ मोर्चात मोठ्या संख्याने सहभागी होतील आशी माहिती संस्थेचे खजिनदार दत्तात्रेय शिंदे यांनी दिली आहे.

Web Title: shetkati vikas sanstha sunday long march