corona virus effect in  tourism kolhapur marathi news
corona virus effect in tourism kolhapur marathi news

कोरोनामुळे परदेशी सहलींना बसला 'असा' फटका....

कोल्हापूर : जगभरात कोरोनाविषयी चिंता वाढली आहे. याचा परिणाम पर्यटन व्यवसायावरही झाला आहे. भारतातून विदेशात पर्यटनाला जाण्यासाठी अनेकांनी बुकिंग केले होते, त्यानुसार टूर्स कंपन्यांनी विदेशात प्रवास, निवासाचे बुकिंग केले. आता अनेक पर्यटकांनी पर्यटन रद्द केले तर काही देशांनी पर्यटन तूर्त थांबविले आहे. त्यामुळे टूर्स कंपन्यांसह पर्यटकांची अंदाजे २५ कोटींहून अधिक उलाढाल ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे. परस्पर सहमतीने नियोजित सहली पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

शहरातील एका नामांकित खासगी टूर्स कंपनीने भूतानची सहल आयोजित केली होती. त्यासाठी ५० पर्यटक नोंदवले होते. येत्या दोन दिवसांत जाणाऱ्या सहलीचे नियोजन झाले होते. 
 आता भूतान सरकारकडून शनिवारी रात्री येत्या दोन आठवड्यांसाठी पर्यटकांनी येऊ नये, असा संदेश आला आणि भूतानची सहल तूर्त रद्द झाली. त्यामुळे बहुतांश पर्यटक नियोजित सहल पुढे ढकलावी, आम्ही जाण्यास तयार आहोत, असे सांगत आहेत. तर काहींनी भरलेले पैसे परत मागितले आहेत.

दीड महिन्यापासून सहली रद्द
थोड्या फार फरकाने दुबई, मॉरिशस, सिंगापूर, थायलंड, मलेशिया या देशांत जाणाऱ्यांचे प्रमाण येथे लक्षणीय आहे; मात्र गेल्या दीड महिन्यापासून या देशांत जाणाऱ्या पर्यटकांनी सहली रद्द केल्या तर काही जण पैसे परत मागत आहेत. अशाच स्थितीत अमेरिकेचे पुढील महिन्यासाठी बुकिंग दोन तारखांसाठी झाले होते; मात्र अनेकांनी तेही रद्द केले. अशीच स्थिती जर्मनी, इटली, स्पेनलाही आहे. तेथे विमानसेवा खंडित आहे. त्यामुळे तिकडचे पर्यटनही कोलमडले आहे. 

पर्यटकांचा समजूदारपणा

गेल्या तीन - चार महिन्यांपूर्वी अनेकांनी खासगी टूर्स कंपनीकडे विदेशी सहलीसाठी बुकिंग केले होते. यात अनेकांनी सहलीच्या रक्कमेपैकी २० ते ५० टक्के रक्कम गुंतवली आहे. तर टूर्स कंपन्यांनी त्यात स्वतःचे पैसे घालून त्या त्या देशात हॉटेल, विमान, स्थानिक प्रवासी वाहतुकीच्या गाड्यांसाठी पैसे भरून बुकिंग केले. त्यानुसार तारीख निश्‍चित करून परदेशात सहल पाठवण्याची तयारी सुरू केली. इतक्‍यात एकेका देशातील विमानसेवा खंडित होऊ लागली.

त्या विमानसेवेसाठी गुंतवलेले पैसे परत मिळालेले नाहीत. काही पर्यटक टूर्स कंपनीकडे पैसे परत मागत आहेत. तर बहुतांश पर्यटक समजूदारपणा दाखवत पुढील काही महिन्यांत तारीख मिळेल त्या तारखेला पर्यटनास जाऊ, असेही सांगत आहेत. 
सहली रद्द होत असल्याने नवीन बुकिंगचे प्रमाण नगण्य आहे. येत्या दोन - तीन महिन्यांत अशीच परिस्थिती राहिल्यास कर्मचाऱ्यांचे पगार देणेही टूर्स कंपन्यांना कठीण होईल. 

जेव्हा विमानसेवा सुरू होईल तेव्हा सहल

अनेक स्थानिक पर्यटकांनी विदेशी सहलींसाठी बुकिंग केले होते; मात्र भूतानसह विदेशातील सहली रद्द कराव्या लागल्या. यात टूर्स कंपन्यांचे पैसे अडकल्याने कोंडी झाली. मात्र, अनेक पर्यटक समजूतदारपणे जेव्हा विमानसेवा सुरू होईल तेव्हा सहल करू, असा निश्‍चय करीत आहेत. आम्ही स्वतःहून ज्यांना देशांतर्गत सहल करायची आहे त्यांच्यासाठी उत्तर भारत, काश्‍मीर, लेह, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल असे पर्याय देत आहोत. त्यालाही प्रतिसाद लाभत आहे. 
- रवींद्र पोतदार, संचालक, गिरीकंद हॉलिडेज ट्रॅव्हल्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com