

Eknath Shinde Sindhudurg Politics
esakal
Sindhudurg Leader Joins Eknath Shinde : राज्यात ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला असतानाच ठाकरे गटाचे कोकणातील बडे नेते आणि सिंधुदुर्गचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पारकर यांच्या या उपस्थितीमागे नेमके राजकीय समीकरण काय, ते शिंदे गटाच्या वाटेवर आहेत का, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.