रेडी बंदरातील त्या' जहाजाचा चीनशी संबंध नाही 

Ship In Port Of Redi Has No Connection With China
Ship In Port Of Redi Has No Connection With China

शिरोडा ( सिंधुदुर्ग) - रेडी बंदरात दाखल झालेले दर्याजया हे खनिजवाहू जहाज इंडोनेशिया देशातील असून त्या जहाजाचा चीनशी काहीही संबंध आलेला नाही. या जहाजावरील 21 कर्मचारी हे भारतीय असून त्या सर्वांची शासनाच्यावतीने वैद्यकीय तपासणी पूर्ण करूनच या जहाजात खनिज भरण्याचे काम सुरू केल्याचे स्पष्टीकरण करून केंद्र व राज्य शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार रेडी पोर्टचे कामकाज सुरू असल्याची माहिती रेडी पोर्ट लिमिटेडचे उपाध्यक्ष बी. एस. शेणॉय यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

कोरोना व्हायरसने जगात हाहाकार माजविला अहो. या पार्श्‍वभूमीवर रेडी बंदरात दाखल झालेल्या खनिजवाहू जहाजामुळे जिल्ह्यातील दोन-तीन दिवस उलट सुलट चर्चा चालू असल्याने रेडी पोर्ट लि. ने पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण केले. यावेळी पोर्ट अधिकारी संदीप चौहान, उद्योजक पराग शिरोडकर उपस्थित होते. 

श्री. शेणॉय पुढे म्हणाले, ""हे जहाज इंडोनेशिया देशातून दगडी कोळसा घेऊन मुंबई पोटं ट्रस्ट येथे आले होते. त्याठिकाणी पोटं ट्रस्टच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची तपासणी करून त्यांना कोरोना नसल्याचे प्रमाणपत्र दिले होते. त्यानंतर हे जहाज रेडी बंदरात दाखल झाले. महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाचे अधिकारी रेडी पोर्टमध्ये भेट देऊन कामकाजाची पाहणी करतात. डंपर्स चालकांची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यांना मास्क आदी पुरविले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होताकामा नये याची दक्षता घेतली जात आहे.'' 

जहाजावर खनिज भरण्यासाठी लागणारे तेरा कर्मचारी हे शिरोडा केरवाडीतील असून त्यांची शिरोडा उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय तपासणी केलेली आहे. त्यांना पीपीई किट, मास्क, सॅनिटायझरचा पुरवठा करण्यात येत आहे. जहाजावरील लोडींग पूर्ण झाल्यावर त्या सर्वांचे थेट संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे. 
- बी. एस. शेणॉय 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com