esakal | शिरोडा मच्छिमार्केट बंद​ करुन मच्छिमार आले रस्त्यावर...

बोलून बातमी शोधा

shiroda panchakoshi fishermens agitations kokan marathi news

शिरोडा वेळागर समुद्रकिनारा येथे सुरू असलेल्या पॅरासिलिंग व स्कुबा नौकानयन प्रकल्पा विरोधात शिरोडा पंचक्रोशी मच्छिमारांनी आंदोलन केले.

शिरोडा मच्छिमार्केट बंद​ करुन मच्छिमार आले रस्त्यावर...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) : शिरोडा वेळागर समुद्रकिनारा येथे सुरू असलेल्या पॅरासिलिंग व स्कुबा नौकानयन प्रकल्पा विरोधात शिरोडा पंचक्रोशी मच्छिमारांच्या घेराव आंदोलनाला मांडवी खाडी रोड वरून रॅली ने सुरुवात करण्यात आली.

हेही वाचा- तीन वर्षाच्या आत्याचाराने ती राहिली गरोदर आणि...

आपल्या हक्कासाठी हजारो मच्छिमार बांधव रस्त्यावर उतरले. दरम्यान आज संपूर्ण शिरोडा मच्छिमार्केट बंद ठेऊन सर्व मच्छिमार आंदोलनात सहभागी झाले.

हेही वाचा-  महावितरणचा झटका ; वीज बील भरा अन्यथा...

शिरोडा मच्छिमार्केट बंद​

प्रदेशीक बंदर अधिकारी वेंगुर्ले यांनी शासनाने दिलेले नियम व अटी याकडे दुर्लक्ष करून शिरोडा वेळागर येथील जलक्रीडा प्रकल्पाला परवानगी दिली. यामुळे मच्छिमारांना मत्स्यदुष्काळाला सामोरे जावे लागल्यामुळे मच्छिमार रस्त्यावर उतरले. यावेळी जेट्सकी बंद करा.. पॅरासिलिंग बंद करा.. च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.