esakal | कोकणात साडे तीन लाख थाळयांनी भागवली गरजूंची भूक
sakal

बोलून बातमी शोधा

shiv bhojan thali working in lockdown period various people advantage during lockdown in ratnagiri

1 एप्रिल पासून आतापर्यंत जिल्ह्यातील 20 केंद्रावर 3 लाख 50 हजार थाळयांनी अनेक गरजूंची भूक भागवली

कोकणात साडे तीन लाख थाळयांनी भागवली गरजूंची भूक

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्याने संपूर्ण देशामध्ये टाळेबंदी जाहीर करण्यात आली. हे संकट  'ना भूतो ना भविष्यती' असे आहे. या लॉकडाऊनचा परिणाम थेट लोकांच्या रोजगार आणि व्यवसायांवर झाला. हातावर पोट असणार्‍यांची स्थिती अधिकच बिकट आणि दयनीय झाली. मात्र अशा सर्वांच्या मदतीला धावून आली ती ‘शिवभोजन योजने’ची थाळी. 

हेही वाचा - चाकरमान्यांची लगबग, सावंतवाडी आगार सज्ज, आरक्षण फुल्ल...

1 एप्रिल पासून आतापर्यंत जिल्ह्यातील 20 केंद्रावर 3 लाख 50 हजार थाळयांनी अनेक गरजूंची भूक भागवली. राज्यात सत्तेवर येताना 10 रुपयांमध्ये गरिबांना जेवण पुरवणारी नावीन्यपूर्ण अशी शिवभोजन थाळी ही योजना सुरू झाली. ज्यांना उपजीविकेचे कोणतेही साधन उपलब्ध नाही, अशा सगळ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली. अत्यंत माफक दरात देणारी गरिबांची एक वेळच्या जेवणाची व्यवस्था करणारी ही शिवभोजन थाळी योजना आरंभापासून  सर्वांना आधार देणारी ठरली.  टाळेबंदीत हाताला काम नाही, अशा स्थितीत यात अधिक सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि 10 रुपयांना असणारी ही थाळी 5 रुपयांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली.

योजना सुरु झाली त्यावेळी जिल्हयात 3 ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरु झाली. मात्र लॉकडाऊन दरम्यान इतर प्रांतात स्थलांतरित होणारे मजूर आणि ज्यांचे व्यवसाय पूर्ण ठप्प झाले अशांची संख्या वाढली. त्यामुळे जास्त ठिकाणी ही सुविधा असावी, अशी मागणी येताच शासनाने याचा विस्तार तालुक्यांच्या ठिकाणीही करण्याचा निर्णय घेतला. जिल्हयातील 9 तालुक्यांच्या ठिकाणी 20 शिवभोजन थाळी केंद्र सुरु केली.  22 मार्च नंतर सर्वत्र लॉकडाऊन सुरु झाल्याने गतिमान पद्धतीने निर्णय घेऊन संबधित सर्व ठिकाणी शिवभोजन थाळी उपलब्ध झाल्याने कठीण काळात गरिबांना या योजनेने मोठा आधार दिला. 

हेही वाचा - आगळी वेगळी प्रथा! चतुर्थीच्या पाचव्या दिवशी गणेश प्रतिष्ठापना..

1 एप्रिल पासून आतापर्यंत या 20 केंद्रावर 5 रुपयात शिवभोजन थाळी मिळत आहे. अशा साधारण 3 हजार थाळयांच्या माध्यमातून हातावर पोट असणार्‍या सर्वांना भोजन मिळत आहे. जिल्हयात या अंतर्गत आतापर्यंत 3 लाख 50 हजार थाळयांचे वाटप झाले आहे. वाटीभर वरण, एक भाजी, भात आणि चपाती या शिवभोजन थाळीच्या माध्यमातून  दिली जाते. कोरोना विषाणूच्या उद्रेक काळात उपलब्ध आणि सकस अन्न या निमित्ताने जिल्हयातील गरजू आणि गरीब जनतेला देण्याचे काम शिवभोजन थाळी योजनेच्या रूपाने सुरु आहे.  या योजनेने अनेकांची भूक भागवली आहे. त्यामुळे कठीण काळात गरजू लोकांचा आधार म्हणून प्रसिद्ध झाली आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

loading image