विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल शिवसेनेच्या 'या' आमदारास डाॅक्टरेट

Shiv sena MLA Rajan Salvi Gets Doctorate On Social Work
Shiv sena MLA Rajan Salvi Gets Doctorate On Social Work

राजापूर ( रत्नागिरी ) - राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये विजयाची हॅट्ट्रिक साधणारे आमदार राजन साळवी यांनी सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक आदी विविध क्षेत्रांमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून केलेल्या सामाजिक कार्याची दखल किंग्डम ऑफ टोंगा या देशातील कॉमनवेल्थ वोकेशनल युनिव्हर्सिटीने घेतली आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना डॉक्‍टरेट ही पदवी देऊन गौरव केला आहे.

आमदार साळवी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. शिवसेना शाखाप्रमुख ते नगरसेवक, नगराध्यक्ष आणि शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच सलग तीनवेळा आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालय, असो जिल्ह्यातील अन्य कोणतेही आरोग्य केंद्र असो. सर्वसामान्यांना त्यांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे. रक्तदान शिबिरे, रक्तपेढी, औषधपेढी, रुग्णवाहिका या माध्यमातून आरोग्य क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे आमदार साळवी अनेकांच्या जीवनात देवदूत ठरले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल

सर्वसामान्यांच्या न्याय हक्क मागण्यांसाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने छेडली आहेत. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांसाठी लढा दिला आहे. आमदार म्हणून त्यांनी विधानसभेमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्‍न मांडून त्यांना वाचा फोडली आहे. त्यांच्या या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंग्डम ऑफ टोंगा या देशातील कॉमनवेल्थ वोकेशनल युनिव्हर्सिटीने घेवून त्यांना डॉक्‍टरेट ही पदवी बहाल केली आहे. पुढील महिन्यात साळवी यांना ही पदवी देऊन गौरव केला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com