"नीलेश राणे यांच्या वक्तव्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही"

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

नानार प्रकल्पा च्या भागातील चौदाशे एकर जमीन श्री देशमुख यांनी विकत घेतल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला होता.

सिंधुदुर्ग : खासदार नीलेश राणे यांच्या वक्तव्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. निलेश राणे हे भाजपचे आऊटडेटेड झालेले नेते आहेत अशी जोरदार टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी चौदाशे एकर जमिनीचे व्यवहार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मावसभाऊ संचालक असलेल्या कंपनीमार्फत झाले आहेत, असा खळबळजनक आरोप भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. शिवसेनेने या प्रकल्पाला प्रथम विरोध केला. त्यांच्याच आशीर्वादाने नाणारमध्ये परप्रांतीयांनी जमीन खरेदी केली आणि आता शिवसेनाच रिफायनरी प्रकल्प आणेल, असा दावाही त्यांनी केला. यावर प्रतिक्रिया देताना खासदार श्री राऊत यांनी राणे यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा- कोकणात बिबट्याचा वावर  : चरवेलीत  विहिरीत पडलेल्या  बिबट्याला काढण्यात आले यश -

निलेश राणे हे कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करून बोलत नाहीत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला आम्ही कधीच कवडीचीही किंमत देणार नाही. निलेश राणे हे भाजपचे आऊटडेटेड झालेले नेते आहेत  अशी टीकाही त्यांनी केली आहे.
 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena MP Vinayak Raut strongly criticized nilesh rane comment