

Shiv Sena leaders join BJP
sakal
पाली : सुधागड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा संपर्कप्रमुख मिलिंद देशमुख आणि तालुकाप्रमुख रवींद्र देशमुख यांनी बुधवारी (ता. 21) शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे सुधागडात शिंदे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून भाजपची ताकद दुपटीने वाढली आहे.