सिंधुदुर्गात राणे विरुद्ध शिवसेना सोशल युद्ध  

Shiv Sena Social War Against Nitesh Rane In Sindhudurg
Shiv Sena Social War Against Nitesh Rane In Sindhudurg

कणकवली ( सिंधुदु्र्ग ) - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय सुरू केले जाईल, अशी घोषणा अधिवेशनात केली होती. त्या मुख्यमंत्री कार्यालयाचे झाले तरी काय ? असा सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. सिंधुदुर्गात सध्या सत्ताधारी शिवसेना विरूद्ध राणे असे सोशल युद्ध सुरू झाले आहे. राणेंच्या या ट्‌विटमुळे सोशल मिडीयावरील वाद अजून भडकण्याची शक्‍यता आहे. 

कोरोना प्रादुर्भाव आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी विरोधक यांचे राजकारण जोर धरू लागले आहे. राणे विरूद्ध शिवसेना अशी सोशल मिडीयावरील लढाई दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. आमदार राणे यांनी आज एका ट्‌वीटच्या माध्यमातून जुन्या आठवणीला उजाळा दिला आहे. डिसेंबरच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय असणार. कोरोनाच्या या लढाईत सामान्य लोकांना मदत झाली असती. पण आता त्याचा साधा उल्लेखही नाही. सत्ताधारी आमदारांनी उगाचच टाळी मारून दाद दिली होती, अशी टिका केली आहे. 

सिंधुदुर्गात सध्या राणे विरूद्ध शिवसेना असे सोशल मिडिया वॉर तापू लागले आहे. भाजपचे आमदार राणे हे सध्या मुंबईत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना कार्यकर्ते रान तापवताना दिसत आहेत. जुहुच्या बंगल्यात बसून तुम्ही खुशाल राहा. आम्ही येथे राहून कोरोनाला हरवू, तुम्ही आमची काळजी करू नका, असे सोशल मिडियावर जाहीरपणे मांडत आहेत. जिल्ह्यात शनिवारी आठ रूग्ण सापडले होते. यातील सहा रूग्ण हे राणेंच्या कणकवली विधानसभा मतदार संघातील होते. या पार्श्‍वभूमीवर आमदार राणे यांनी कोरोनाचे रूग्ण आढळल्याने जनतेने घाबरून जावू नये, असा संदेश देणारा व्हिडीओ वायरल केला होता. यावरून सोशल युद्ध जोर धरू लागले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com