Ratnagiri ZP Elections : रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचा झंझावात; जिल्हा परिषदेसह सहा पंचायत समितीत सत्ता

Samant Leads : रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल हा केवळ आकड्यांचा खेळ न राहता, कोकणातील राजकीय ताकदीचं स्पष्ट चित्र दाखवणारा ठरला आहे.
Shiv Sena leaders celebrate sweeping victory

Shiv Sena leaders celebrate sweeping victory

sakal

Updated on

रत्नागिरी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीसह अन्य तालुक्यात प्रचाराची नियोजनबद्ध यंत्रणा राबविली होती. त्याचे फलित म्हणजेच रत्नागिरी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. सर्वाधिक जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या ५६ पैकी ४० जागा, तर ९ पैकी ६ पंचायत समितींवर निर्विवाद वर्चस्व राखत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com