" ऊठसूट पत्रकार परिषदा घेण्यापेक्षा शहराच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे " : संजू परब यांना कोणी दिला सल्ला वाचा.....

शिवप्रसाद देसाई
Tuesday, 28 July 2020

सावंतवाडीत एखादा व्यक्ती बाहेरगावावरून येतो. पालिकेला त्याची माहिती मिळत नाही. असे कसे....

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) :  गोरगरीब भाजीवाल्यांवर कारवाई करण्यापेक्षा नगराध्यक्ष संजू परब यांनी कोरोनाच्या काळात शहराच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे, तशा सूचना प्रशासनाला द्याव्यात. ऊठसूट पत्रकार परिषद घेऊ नये, असा सल्ला शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी श्री. परब यांना दिला आहे.

आपण योग्य पद्धतीने पालिकेची जबाबदारी सांभाळतो, असे सांगणार्‍या श्री. परब यांच्या पालिकेत कोरोनाग्रस्त व्यक्ती फिरून जाते आणि ते श्री. परब यांच्यासह त्या वार्डातील नगरसेवकाला सुद्धा कळत नाही ही दुर्दैवाची बाब आहे, असाही टोला त्यांनी लगावला. याबाबत श्री. राऊळ यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.

हेही वाचा- कोकणात गणेशोत्सवासाठी  आयसी एमआरच्या गाईडलाईन नुसार नियम  : उदय सामंत -

पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सावंतवाडीत एखादा व्यक्ती बाहेरगावावरून येतो. पालिकेला त्याची माहिती मिळत नाही. कुठल्याही अधिकारी वर्गाला माहिती नसणेे व वॉर्डातील नगरसेवकानेही माहिती पालिका प्रशासनाला न देणे म्हणजेच नगराध्यक्षांचा पालिका प्रशासनावर अंकुश नाही. त्या कुटुंबियांना क्वारंनटाईन करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची नव्हती का ? हे प्रथमता श्री. परब यांनी जाहीर करावे. नंतरच संबंधित दाम्पत्यावर गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल करून आपली चूक लपवण्याचा हा श्री. परब यांचा प्रयत्न आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena taluka chief Rupesh Raul commented for sanju parab in sindhudurg