पाली नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकणार - अनंत गिते 

अमित गवळे 
रविवार, 15 जुलै 2018

पाली : पालीच्या सर्वांगिण व शास्वत विकासासाठी पाली नगरपंचायत होणे गरजेचे आहे. पालीच्या नागरिकांची देखील हिच इच्छा आहे. पाली नगरपंचायत झाल्यास पाली नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकणार असा विश्वास केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी व्यक्त केला. झाप येथील शुभमंगल कार्यालयात रविवारी (ता.15) झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात अनंत गिते बोलत होते.

पाली : पालीच्या सर्वांगिण व शास्वत विकासासाठी पाली नगरपंचायत होणे गरजेचे आहे. पालीच्या नागरिकांची देखील हिच इच्छा आहे. पाली नगरपंचायत झाल्यास पाली नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकणार असा विश्वास केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी व्यक्त केला. झाप येथील शुभमंगल कार्यालयात रविवारी (ता.15) झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात अनंत गिते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पालीचे माजी शहर उपाध्यक्ष अनुपम कुलकर्णी तसेच त्यांच्या अनुपमदादा मित्रमंडळाच्या शेकडो सदस्यांसह सुधागड तालुक्यातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष व शेतकरी कामगार पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी  येथील शिवस्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांचे आशिर्वाद घेवून अनंत गिते यांच्या समवेत पालीतून मोटार व बाईक रॅली काढण्यात आली. 

सभागृहात बोलताना गिते म्हणाले, पाली नगरपंचायत होउ नये यासाठी इतर राजकीय पक्ष व नेत्यांनी खोडा घातला होता. तसेच नगरपंचायत होत असताना राजकीय नेत्यांनी घाणेरडे राजकारण करुन या प्रक्रीयेला विरोध केला. पाली गावाचा सर्वांगीण विकास साधून येथील नागरीकांचे जिवनमान उंचावण्यासाठी पाली नगरपंचायत होणे अत्यंत गरजेचे आहे. पाली नगरपंचायतीचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी केंद्रीय मंत्री या नात्याने सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन गिते यांनी दिले. 

आगामी लोकसभेसाठी अनंत गिते यांच्यासमोर पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांचे कडवे आव्हान असणार आहे. मात्र या निवडणुकीवर केवळ अनंत गिते यांचेच नाव कोरले असल्याचे ठाम विश्वास गीते यांनी व्यक्त केला. 

यावेळी अनुपम कुलकर्णी यांनी सांगितले की पाली नगरपंचायतीचा नगराध्यक्ष बनण्याची संधी शिवसेना पक्षाकडून दिल्यास या पदाला न्याय देईन. पालीचा सर्वांगिण विकास व समाजपयोगी कामे करण्याच्या निस्वार्थी हेतूने शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई म्हणाले की लोकांना वापरुन घेणे व स्वतः सत्तेच्या खुर्च्यांवर बसणे, व कार्यकर्त्यांना केवळ कार्यकर्ताच ठेवणे हे काम राष्ट्रवादी करते.  कोट्यावधी रुपये खर्च करुन तटकरेंचा पराभव होतो तर दुसर्‍या बाजूला कुठलाही खर्च न करता मतांनी शिवसेनेची पेटी भरते व निवडणुक जिंकली जाते . यावेळी किशोर जैन म्हणाले की सत्तेच्या राजकारणात पाली नगरपंचायत खोळंबली  परंतू आता शिवसेनेच्या पुढाकाराने पालीला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त होईल 

कार्यक्रमास अनंत गिते यांच्यासह शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई, शिवसेना जि.प सदस्य किशोर जैन, जि.प सदस्य रविद्र देशमुख, शिवसेना सुधागड तालुका प्रमुख मिलिंद देशमुख, रोहा तालुका प्रमुख समिर शेडगे, माणगाव तालुका प्रमुख अनिल नवगणे, पंचायत समिती उपसभापती उज्वला देसाई, पं.स सदस्य नंदू सुतार, रविंद्र खंडागळे, सचिन जवके, संदीप दपके, आपटवणे सरपंच शरद चोरघे, नाडसूर सरपंच उज्वला पवार, दहिगाव सरपंच  सुषमा देशमुख, आदिंसह शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थीत होते. 
 

Web Title: Shiv Sena's saffron flag will be thrown on Pali Nagar Panchayat - Anant Gite