नीतेश राणे म्हणाले, `येथे` शिवपुतळा उभारणार 

Shivaji Maharaj Statue On Keshavsut Katta Nitesh Rane Promise
Shivaji Maharaj Statue On Keshavsut Katta Nitesh Rane Promise

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - शहरातील मोती तलावाच्या मध्यभागी असलेल्या केशवसुत कट्ट्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर विराजमान झालेला भव्य पुतळा उभारण्याची घोषणा आमदार नीतेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी येथे केली. 

अरबी समुद्रातील शिवछत्रपतींच्या स्मारकाच्या पुतळ्याप्रमाणे हे स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून निधी खर्च करण्यात येणार आहे. हा पुतळा उभारण्याबरोबर केशवसूत कट्टा सुशोभीकरणासाठी 50 लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तात्काळ जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठविण्याचे निर्देश आमदार नितेश राणे यांनी नगराध्यक्ष संजू परब यांना दिले. 

मोती तलावाच्या मध्यभागी केशवसुत कट्ट्यावर उभारण्यात येणाऱ्या शिवाजी महाराज यांच्या स्मारकामुळे संस्थानकालीन या शहराच्या वैभवात आणखीनच भर पडेल. महाराष्ट्राला अभिमानास्पद ठरेल, असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक याठिकाणी उभारण्यात येईल, असा विश्‍वास आमदार राणे यांनी यांनी आज येथे व्यक्त केला. येथील केशवसुत कट्ट्यावर तुतारीच्या जागेवर आज प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव पालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी श्री. राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आरोग्य व क्रीडा सभापती परीमल नाईक, सुधीर आडिवरेकर, दिपाली भालेकर, मोहिनी मडगावकर, चित्रा भिसे, संजू विरनोडकर, दिलीप भालेकर, अजय गोंधावळे आदी उपस्थित होते. 

नियोजित कार्यक्रमांमध्ये सावंतवाडी असेल 

जिल्ह्यातील नियोजित कार्यक्रमांमध्ये यापुढे सावंतवाडीचा अंतर्भाव निश्‍चितपणे केला जाणार असल्याचे वक्तव्य आमदार राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com