#saasthchal शिवरायांच्या पादुका डोक्यावरुन पंढरपूर वारीला

सुनील पाटकर
बुधवार, 4 जुलै 2018

महाड : आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरला लाखो वारकरी जात असतात. रायगडावरुन छत्रपती शिवरायांच्या पादुका डोक्यावरुन पंढरपूरला घेऊन जाणारी पायी वारी सोमवारी 2 जुलैला गडावरुन रवाना झाली. एकवीस दिवस ही पायी वारी केली जाणार आहे.

पुण्यातील संदिप महिन हे या पायी वारीचे आयोजन करतात. वारीचे हे चौथे वर्ष आहे. सलग चार वर्षे या वारकऱ्यांची निवास व भोजन व्यवस्था पाचाड येथील देशमुख हॅाटेलचे मावक अनंत देशमुख करत असतात.

2 जुलैला रायगडावरुन छत्रपती शिवरायांच्या पादुका डोक्यावर घेऊन जाणाऱ्या वारीची सुरुवात झाली. या वारीत 40 वारकरी आहेत. चालत चालत एकवीस दिवसांनी वारी पंढरपूरला पोहचेल.

Web Title: Shivaji maharaj's Paduka take on head and go to the warri