पाणीपुरवठाप्रश्‍नी शिवसेनेचे शिष्टमंडळ पालिकेत धडकले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

राजापूर - गेल्या काही दिवसांपासून शहरात एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा, त्यातून कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे अपुरे पाणी यामुळे माजी विरोधी गटनेते अभय मेळेकर आणि शहरप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालिकेवर धडक दिली.

नगराध्यक्ष हनिफ काझी यांची भेट घेऊन शहरवासीयांना पुरेसे पाणी वेळेत पुरवावे, अशी मागणी केली. यावेळी नगराध्यक्ष श्री. काझी यांनी या शिष्टमंडळाला टंचाईच्या काळात शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे आश्‍वासन दिले.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील सायबाच्या धरणातील पाणीसाठा कमालीचा घटल्याने त्याचा फटका शहराला बसताना शहरात पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे. त्यातूनच पालिका प्रशासनाने १ एप्रिलपासून शहरात एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्याही पाणीपुरवठ्यात विस्कळितपणा निर्माण झाला आहे. त्याचा फटका शहरवासीयांना बसला. त्यामुळे शिवसेनेने हा मुद्दा हाती घेतला. यावर्षी मुबलक पाऊस पडला असतानाही शहराला एकदिवसाआड पाणीपुरवठा करावा लागतोय, याबद्दल शिष्टमंडळाने आश्‍चर्य व्यक्त केले. याबाबत प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न दिल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावर ठोस उपाय करण्याची मागणी त्यांनी केली. बंधारे बांधून बंद वा नादुरुस्त बोअरवेल तातडीने दुरुस्त करण्याची मागणीही करण्यात आली. शहरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने केलेल्या नियोजनाची माहिती दिली. जलवाहिन्यांची गळती काढण्यात आली.

त्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी झाला. बोअरवेलची दुरुस्ती व विहिरीतील गाळ तत्काळ उपसण्याचे आदेश प्रशासनाला दिले. शिवसेना शहरप्रमुख श्री. पवार, माजी विरोधी गटनेते श्री. मेळेकर, विद्यमान विरोधी गटनेते विनय गुरव, नगरसेवक सौरभ खडपे, नगरसेविका प्रतीक्षा खडपे, स्वाती बोटले, मनीषा मराठे, शुभांगी सोलगावकर, पूजा मयेकर, माजी नगरसेवक विजय गुरव, माजी नगरसेविका श्रद्धा धालवलकर, माजी नगराध्यक्ष कल्याणी रहाटे, वीणा विचारे, प्रतीक्षा मांजरेकर, अनिल कुवेसकर, उमेश कोळवणकर आदी उपस्थित होते.

Web Title: shivsena delegation in municipal for water supply