...तर तटकरेंना तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही: गिते

Anant Gite
Anant Gite

माणगांव : आम्ही जनतेसाठी फिरता दवाखाना, रुग्णवाहिका, दिव्यांगाना इलेक्ट्रीकलवर चालणारी स्कुटर देतोय. पण जे 15 वर्षे मंत्री होते, जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांनी जनेतसाठी काय दिले? त्यांनी 70 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा दिला. माझ्यावर टीका करणाऱ्याला माझ्या नखाची सुध्दा सर त्यांच्या आयुष्यात येणार नाही, मी जर तोंड उघडले तर रायगडात सुनिल तटकरेंना तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, अशी जोरदार टीका केंद्रीय अवजड व उद्योग मंत्री अनंत गिते यांनी माणगांव येथील निर्धार मेळाव्यात बोलताना केली.

माणगांव तालुका शिवसेनेचा निर्धार मेळावा व वातानुकुलीत अद्यावत सुविधा असलेली रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा कार्यक्रम शुक्रवार दि. 18 जानेवारी 2019 रोजी सायंकाळी 5  वाजता अशोकदादा साबळे विद्यालय माणगांवच्या भव्य प्रांगणात संपन्न झाला. त्यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री गिते यांनी सुनिल तटकरेंवर सडकून टिका केली. या मेळाव्याला ठाण्याचे खा. राजन विचारे, आ. भरतशेठ गोगावले,  माजी आ. तुकाराम सुर्वे, उद्योगपती विक्रम किर्लोस्कर, संपर्क प्रमुख सदाभाऊ  थरवळ,  जिल्हा प्रमुख रविशेठ मुंढे, किशोर जैन, रत्नागिरी जिल्हाप्रमुख सचिन कदम, शिवसेना नेते राजीव साबळे, माणगांव तालुका प्रमुख अनिल नवगणे, रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे, माणगांव पं. स. सभापती सुजित शिंदे, माजी सभापती महेंद्र तेटगुरे, राजेश पानवकर, युवासेना अधिकारी विकास गोगावले, राजिप सदस्या स्वाती नवगणे, अमृता हरवंडकर, माजी तालुकाप्रमुख अरुण चाळके, माणगांव पं. स. उपसभापती ममता फोंडके, तळा नगराध्यक्षा रेशमा मुंढे, शहरप्रमुख अजित  तार्लेकर, स्विकृत नगरसेवक नितीन बामगुडे, महेंद्र मानकर, अरुणा  वाघमारे, सुखदा धुमाळ, साधना पवार, शर्मिला सुर्वे, संपर्क प्रमुख  बाजीराव घाग, माजी उपसभापती गजानन अधिकारी, प्रकाश टेंबे,  नथुराम बामणोलकर, दुर्वास म्हशेळकर, रविंद्र टेंबे, प्रभाकर ढेपे, कपिल गायकवाड, नगरसेवक सचिन बोंबले, अनिल सोनार, सुनिल पवार, अच्युत तोंडलेकर आदिंसह शिवसैनीक, महिला कार्यकर्त्या आदि हजारोंच्या संख्येने संख्येने उपस्थित होते.

निर्धार मेळाव्यात मार्गदर्शन करताना केंद्रियमंत्री गिते यांनी सांगितले माणगांवच्या इतिहासातील हा विराट असा मेळावा आहे. या मेळाव्यात सुसज्ज व अद्यावत अशा रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला. कितीही गंभीर रुग्ण  असला तरी त्याला या रुग्णवाहिकेतून वेंटेलीटर लावून रुग्णालयापर्यंत पोहचवून  त्या रुग्णाला जीवनदान मिळू शकते. वातानुकुलीत अशी अद्यावत ही 51 लाख रुपयांची रुग्णवाहिका आहे. या रुग्णवाहिकेतून जो  रुग्ण जाईल त्याला जीवनदान मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपण एक  रुग्णवाहिका देवून थांबणार नाही. म्हणून मी एक निर्णय घेतलाय, याच महिन्यात प्रत्येक तालुक्याला एक असे 16 रुग्णवाहीका आपण देणार असून तो कार्यक्रम लवकरच अलिबागला होणार आहे. त्याचबरोबर जिल्हयात अनेक दिव्यांग आहेत. ज्यांना पाय नाहीत, असे प्रत्येक  तालुक्यातील एका दिव्यांगाला  पाय देण्याचा निर्णय घेतलाय. रायगड जिल्हयातील 18 दिव्यांगाना आपण पहिल्या टप्यात   इलेक्ट्रीकवर  चालणारी स्कुटर देतोय. तो कार्यक्रम लवकरच सुधागड पाली येथे होणार आहे. यापूढे 40 दिव्यांगाणा आपण स्कुटर देणार आहोत. असे सांगत कोकण रेल्वेची मुंबई-रोहा ही लोकल सेवा सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.

फिरता मोफत दवाखाना आपण रायगड जिल्हयात आणला. ज्याची सुरुवात रोहयात केली एका वर्षात 16 हजार रुगणांना आपण मोफत औषधे दिली 7 दिवसांची ओषधे आपण मोफत देतो.मला मतदार संघात चांगला व उत्स्फुर्त असे  वातावरण आहे. येणारी कुठलीही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय पक्षप्रमुखानी घेतला आहे. येणारी प्रत्येक निवडणूक लढून  जिंकायची आहे, असे सांगत केवळ  आठ  दिवसांच्या सुचनेवर मेळाव्याचे अयोजन करुन मेळावा यशस्वी केल्याबद्दल गिते यांनी राजीव साबळे, तालुका प्रमुख अनिल नवगणे व त्यांच्या सर्व सहका-यांना धन्यवाद दिले.

खा. राजन विचारे यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलताना सांगितले, हि निवडणूक अत्यंत महत्वाची असून या निवडणूकीत चांगल्या व्यक्तीमत्वाचे गिते साहेब यांना भरघोस मताधिक्यांनी विजयी करा. आ. भरतशेठ गोगावले यांनी सांगितले  विरोधकांना काहीही बोलू द्या, आपण मंत्री नसतानाही चमत्कार केलाय यापूढेही  करुन गितेंना भरघोस मतांनी निवडून देवू. युवासेना अधिकारी विकास गोगावले यांनी सांगितले एक लाख मताधिक्यांनी गिते साहेबांना निवडून आणू. दानशूर ज्यांनी रुग्णवाहिका दिली ते विक्रम किर्लोस्कर यांनी सांगितले गिते साहेबांच्या रुपाने जंटलमन खासदार व मंत्री पाहिला. रायगड जिल्हा प्रमुख रविशेठ मुंढे यांनी आपल्या मार्गदर्शनात विरोधकांवर जोरदार टिका करीत मी शिवसेनेत जन्माला आलो असून शिवसेनेतच मरणार असल्याची घोषणा केली. तालुका प्रमुख अनिल नवगणे, संपर्कप्रमुख सदाभाऊ थरवळ, बळीराम घाग व नगरसेवक सचिन बोंबले यांनी विरोधकांवर टिका करीत अनंत गितेंना प्रचंड मतांनी निवडून आणू असे सांगितले. या मेळाव्यात तामिळनाडू येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवर कॅरम स्पर्धेत रौप्य पदक  मिळविणारा अशोकदादा साबळे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी शुभम मोहिते याचा केंद्रिय मंत्री अनंत गिते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच माणगांव पंचायत समितीचे नवनिर्वाचीत सभापती सुजित शिंदे व उपसभापती ममता फोंडके यांचाही यावेळी गिते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेळाव्यात युवा सेना कार्यकर्त्यांना पदाधिकारी म्हणून नियुक्ती करुन त्यांना गिते यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. या मेळाव्याचे  सुत्रसंचालन प्रा. डी. एम जाधव यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com