परळी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा पराभव ईव्हीम घोटाळ्यामुळे  : प्रकाश देसाई

अमित गवळे
रविवार, 3 जून 2018

पाली : देशभरात ईव्हिएम मशीनचा घोळ गाजत अाहे. अाता हे लोण खेडेगावात देखील पसरताना दिसत आहे. कारण सुधागड तालुक्यातील परळी ग्रामपंचायतीत शिवसेनेचा दारुण पराभव झाला. जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई यांचा बालेकिल्ला म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायतीत देसाई यांची अनेक वर्षांपासून एकहाती सत्ता होती. मात्र रविवारी (ता.२७) झालेल्या परळी ग्रामपंचायत निवडणूकित शिवसेनचा एकही उमेदवार निवडून अाला नाही. परिणामी याबाबत विरोधकांनी ईव्हिएम घोटाळा केला असल्याचा अारोप देसाई यांनी केला आहे.

प्रकाश देसाई म्हणाले कि परळी गृप ग्रामपंचायतीतील मतदार येवून आम्हाला भेटतात व सांगतात आम्ही मते फक्त राजेश परदेशी आणि शिवसेना उमेदवारांना दिली होती. तरी देखील शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव कसा झाला? त्याचे गुपित आपण बाहेर काढावे अशी मागणी मतदार करीत आहेत. यासंदर्भात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असून, पाली तहसीलदार तसेच जिल्हा अधिकारी यांना तक्रार अर्ज दिला आहे. तसेच या निवडणुकीत जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांसह आमदारांनी येथील निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरुन ईव्हीम मशीन मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा करून हा आकस्मित निर्णय आपल्या बाजूनी फिरवून घेतला आहे असा आरोप देसाई यांनी केला.

  • विरोधकांचा कुटील डाव

जिल्ह्यात माझ्या नेतुत्वाखाली शिवसेनेनी मोठी प्रगती केली अाहे. त्यामुळे प्रकाश देसाई यांना आपण जर त्यांच्याच तालुक्यात शह दिला तर जिल्ह्यात त्याचा प्रतिकुल परिणाम होईल अशी भावना बाळगून या प्रस्थापित नेत्यांनी हा कुटील डाव केला आहे. परंतु शिवसेना ही एक दुसऱ्या पराभवामुळे खचून जाणारी नाही. हा जो चुकीच्या पद्धतीने ईव्हीम मशीन तसेच निवडणूक अधिकारी यांना हाताशी धरून केलेल्या पराभवाच्या मुळाशी शिवसेना गेल्याशिवाय राहणार नाही.
- प्रकाश देसाई, शिवसेना जिल्हा प्रमुख, रायगड

Web Title: shivsena's defeat in parli grampanchayat elections due to evm scam: prakash desai