सावंतवाडी आगारात शिवशाही रोखली

अमोल टेंबकर 
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

सावंतवाडी : पुणे-कीणी नाका महामार्गावर काल झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी आगारात सर्व पक्षियांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवशाही बस तब्बल तासभर रोखण्यात आली.

सावंतवाडी : पुणे-कीणी नाका महामार्गावर काल झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी आगारात सर्व पक्षियांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवशाही बस तब्बल तासभर रोखण्यात आली.

यावेळी अशा प्रकारच्या अपघातग्रस्त बसबाबत योग्य ती भूमिका घ्या अन्यथा एकही बस जाऊ देणार नाही असा इशारा सर्व पक्षांकडून देण्यात आला तसेच तब्बल तासभर शिवशाहीसह अन्य एसटी बसेस रोखण्यात आल्या. यावेळी झालेल्या सागर परब यांच्या वारसांना नोकरी तसेच दहा लाखाची भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी महेंद्र सांगेलकर, निशात तोरस्कर, बबन डिसूजा, प्रशांत जोशी, ऑल्वीन पिन्टो, रंजन बांदेकर, बाबल्या दुभाषी,   अतुल केसरकर, जीतू गावकर, दीलीप भालेकर, अन्नपुर्णा कोरगावकर, अजित सांगेलकर, अमोल साटेलकर, चद्रकांत राणे, संदीप सुकी, रविद्र म्हापसेकर, नंदू गावकर सचिव इंगळे, जोतिबा टपाले, अण्णा साटेलकर, मिलींद देसाई, अखिलेश कोरगावकर, सुधीर राऊळ आदी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी आगाराचे प्रमुख शकील सय्यद यांना जाब विचारला हा प्रकार म्हणजे प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे. शिवशाहीला झालेल्या अपघाताची संख्या लक्षात घेता हे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या बाबत योग्य ती भूमिका घ्या शिवशाहीच्या चालकांना जमत नसेल तर प्रवाशी नियमित एसटीचे पाठवा अशी मागणी करण्यात आली.

यावेळी पोलिस निरीक्षक सुनिल धनावडे यांनी मध्यस्थी केली आपल्या मागण्या एसटीच्या वरिष्ठा पर्यत पाठवू संबंधित मृत वाहकाच्या कुटूबांला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन देण्यात आले.

Web Title: shivshahi stopped in sawantwadi agar