
Son Father Death : पोटच्या १८ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या वडिलांचेही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना आज सावंतवाडी शहरात घडली. क्रिश संभया (वय १८) असे मुलाचे, तर सेव्हिओ संभया (वय ४८) असे वडिलांचे नाव आहे. या घटनेबाबत शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.